शीर्षक - सोच नाही तेथे…
विषय - फजिती
मूळ गीत - सुरेश भट
चांदण्यात फिरताना
चांदण्यात पळताना माझी धरलीस लाथ!
श्वाना रे, आवर हे सावर हे तुझे दात!
निजलेल्या गावातुन
आलो मी एकटाच
दुष्ट पोट कळलावे
पडले मुरडे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !
सांग कसा लोट्याविन
साफ करू अंत:पूर?
तुज वारा छळवादी
अन् हे मच्छर फितूर!
ढास तुझी खाल काढी! स्पर्श तुझा काळरात !
धन्यवाद!