शीर्षक - कुठे शोधिसी मल्ल्या आता…
विषय - राजकारण
गीत- मंगेश पाडगांवकर
कुठे शोधिसी रामेश्वर ...
कुठे शोधिसी मल्ल्या आता, करून गेला काशी
देशातिल "कर"वंत राहिला देशातून उपाशी
कर्ज कोटींचे आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडून
हजर राहिला राज्यसभेला, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या कोर्ट असून खिशाशी
फुलाफुलांच्या गळ्यात माळा, लावुनिया "श्री" भस्म कपाळा
कधी तो घेउन बीअर हाती, उडवितसे विमाने मोठी
हाय अभाग्या "भगवे" नेसुन गेला जिरवुनि खाशी
विजय बोलतो ट्विट मुखातुन, विजय डोलतो प्रसादांतून
कधी होउनी विजय भिकारी, मुदतीसाठी आर्त पुकारी
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी