विडंबन स्पर्धा प्रवेशिका - संदीप चांदणे - प्रेम ५

आता या विडंबनासाठी तरी देव मला माफ करोच!

मूळ गाण्याविषयी:

गीत: देहाची तिजोरी
गीतकार: जगदीश खेबुडकर
गायक/संगीतकार: सुधीर फडके
चित्रपट: आम्ही जातो आमच्या गावा

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा

काय करू देवा?

नेहा'ही' कमजोरी, भक्तीचाही हेवा
काय करू देवा आता काय करू देवा?

झाले प्रेम डोळे मिटूनी, जात मजनूची
मनी आता माझ्या का रे भिती लग्नाची?
धजावल्या विचारांनाही संप का सुचावा?

उजेडात होते प्रेम, अंधारात अहंह्हख्हख्खख्खी
ज्याच्या त्याच्या हाती आहे विख्खीवुख्खूविख्खी
चोर चावटांसी कैसे मिळे हा गोड मेवा?

बाप जणू रस्त्यावरचा मामा सरकारी
आपुलाच असला तरीही आपल्याला मारी
घरोघरी असल्यांचा तोल का सुटावा?

तुझ्या दारी पाडुंरंगा पोरगी पटावी
सहजपणे ती श्रीमंताची तूच मला द्यावी
मार्ग माझा भविष्याचा सरल सुकर व्हावा

लग्नासाठी ज्याने हा प्रेमखेळ केला
बंधनात अडकूनी तो फुका बळी गेला
आपुल्याच मुक्तीसाठी करील मग तो धावा