विडंबन स्पर्धा प्रवेशिका - मनमोहन रोहिदास रोगे - राजकारण १०

मुळ गाणे- प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
विडंबन गीत -
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती विकासाच्या गोष्टी
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
न्यायहक्का अमुच्या, दिली मतपेटी
मतावर होता अमुच्या, तुम्ही अरबोपती
हाती मात्र अमुच्या, राहते करोटी
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती…..
चमच्यावरी तुमची राहे कृपादृष्टी
ते ही खाती तुमच्यासंगे मस्त तुपरोटी
आम्ही मात्र निजतो सदा अर्धपोटी
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती......
नाही कळे आम्हा तुमची कामे मोठी
जन्म सरे अमुचा पैशासाठी
तरी ना मिळता, नाही दु:खीकष्टी
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती......

---- मनमोहन रो. रोगे, ठाणे.
भाषाटः ९८६९१८०९५८
फेब्रुवारी २०१६

प्रभू तू दयाळू

प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता

जगविण्यास देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी कोटी
वासना कशाची नसे अन्य चित्ता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता

तुझ्या पावलांशी लाभता निवारा
निघे शीण सारा मिळे प्रेमधारा
सर्व नष्ट होती मनातील खंता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दात

ज्ञान काय ठावे मला पामराला
मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा
तुझे नाम ओठी नको वेदगीता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता

गीत - उमाकांत काणेकर

संगीत - श्रीकांत ठाकरे

स्वर - महंमद रफी