माल्या तुला शोधू कुठ
कुठल्या देशीं, कुठल्या वेशीं, कुठल्या रूपात ?
माल्या, तुला शोधू कुठं ?
कित्येक कोटी कर्जे तुझी, कित्येक कोटीचे फ्रॉड
परि तू अज्ञात
माल्या, तुला शोधू कुठं ?
उडून जाशी तू आकाशीं, लंडन गावी लपून बसशी ?
कुण्या इंग्लड देशात ?
माल्या, तुला शोधू कुठं ?
ज्या ज्या कर्जबाजारी बँका दिसती भवती, भले-बुरे तू त्यांचे हाल करशी
चोहिकडे तुझा हात
माल्या, तुला शोधू कुठं ?
स्वच्छंदी तू किंगफिशरचा सखा, येथे रमसी सांग उगा का ?
या देशात
माल्या, तुला शोधू कुठं ? शोधू कुठं
______________________________
गीत - सुधीर मोघे/ देवा तुला शोधू कुठ
संगीत - मंगेश धाकडे
स्वर - शाहीर देवानंद माळी
चित्रपट - देऊळ