विडंबन स्पर्धा प्रवेशिका - प्रमोद देर्देकर - प्रेम ४

मूळ गाणे:- जिथे सागरा धरणी मिळते.
चित्रपटः-पुत्र व्हावा ऐसा
गायिका:-सुमन कल्याणपुर
गीतकारः- पी. सावळाराम
संगीतकारः-वसंत प्रभु

माझे विडंबन खालील प्रमाणे :-

जिथे सागरा धरणी मिळते,
तिथे तुझी मी वाऽट लावतेऽ वाऽट लावते,
जिथे सागर आऽ आऽ आ ||धृ||

आईबाबांचे सोडून घरटे,
आले तुजपाशी नशीबच फुटके,
वर्षाचा हिशोब गोळा करुनी येथेच करीन सगळे चुकते,
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते,
जिथे सागरा आऽ आऽ आ ||१||

वेचित वाळूत खडे शिंपले,
गम्य न मजला मी तुजवर फेकले,
प्रेमाचा आभास दावुनी मजला जिवाचे माझ्या तु केले खेळणे,
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते,
जिथे सागरा आऽ आऽ आ ||२||

बघुनी घेईन कोण सटवी पटली,
माझ्या हृदयी कळ ती ऊठली,
या दुःखाची मजलाच का सारखी ठेच लागते?
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते
जिथे सागरा आऽ आऽ आ ||३||

नणंद दिराचे घालीन लोणचे,
सासुचे सासर्यांकडे नंतर बघते,
परिणामाची न पर्वा मजला मी मुक्त झाले,
हो ऽ हो ऽ तिथे तुझी मी वाट लावतेऽ वाट लावते
जिथे सागरा आऽ आऽ आ ||४||