विडंबन स्पर्धा प्रवेशिका - ज्ञानोबाचे पैजार - राजकारण ८

प्रवेशिका क्र ३ .

पेरणा ः- नवनाग स्त्रोत्र

अनंतं वासुकि शेष पद्मनाभं च कम्बलम् ।
शड्खपाल धार्तराष्ट्र तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः ।।
तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत् ।''

आणि हे आमचे णवणाग स्ट्रोट्र

अनंत मुर्ती, दिग्विजय, अरविंद, मायावती, ममता
मुलायम, लालु, नितिश, सवे राहुलबाबाला स्मरता
नाग सापही पळती लांब ही नावे नुसती उच्चारता
विषही त्यांचे होते पाणी, छायाचित्र यांचे दिसता,
हा श्लोक दिनरात बरळणे, ठरेल मोठे घातक
गरळ ओकीत फुत्कारही टाकु लागेल साधक

जय हिंद जय महाराष्ट्र