प्रवेशिका क्र २ .
पेरणा ः- रामदास स्वामींची एक आरती कोणती ते सांगायलाच पाहिजे का? आम्ही लिहिलेली खालची आरती वाचली की ती समजेलच.
चाल ः- लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा
लव्ह करणे तुजवरती मजला हा चाळा
विष करतो तुजला मी व्हॅलेंटाइन डेला
लावण्याच्या तुझीया बसती किती झळा
वार्यावर कुंतल ते, उडती झुळझुळा ॥ १ ॥
सय येता, कळ भिडते, माझ्या हृदयाला,
दर्शन मात्रे कलीजा, खल्लास झाला, हे देवी हे देवी ॥ ध्रु० ॥
कर्पुरगौर काया, नयनीभाव भोळा,
अर्धाधोरुक* धारुनी केसांशी चाळा,
मेकपची उधळण, वर टिशर्ट नीळा,
ऐसी सुंदरी उठवी हृदयात कळा, ॥ २ ॥
मित्र मैत्रिणींनी, गॅदरींग केले
त्यामधे अवचित गाणे तु म्हटले
सगळ्यांनी मग तुजला डोक्यावर घेतले
कोकीलकंठी नाम प्रसिध्द झाले ॥ ३ ॥
अंबरी कुठल्याही सुंदर दिसशी तु नारी
रोज तुझे ग दर्शन वाटे सुखकारी
शंभरजणीं मध्ये दिसते लै भारी
वासुकुलतिलक नित्य तुजला स्मरी ॥ ४ ॥
कठीण शब्दांचे शुध्द मराठी मधे अर्थ
*अर्धोरुक – Half Pant
*अर्धाधोरुक Half of the Half Pant