प्रवेशिका क्र १.
पेरणा ः- अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का (बेवफा सनम -१९९५)
स्वर: सोनू निगम
गीत: अताउल्लाह खान
संगीत: निखिल विनय
एका बॅचलर नोकरदाराची कैफियत थोड्याशा विनोदाच्या अंगाने मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रस्तुत कवीने केला आहे. सुरुवातीला जरी हसु आले तरी सुध्दा कविता संपताना प्रत्येक स्ंवेदनाशिल वाचकाच्या डोळ्याच्या कडा पाणावतील याची कविवर्यांना खात्री आहे. ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावणार नाहीत…… (जाउदे ते आत्ता सांगत नाही कारण ते सांगितले तर इकडे मते कमी मिळतील. तो विषय णंतर कधी तरी.)
ना दिवसा झोपुन देती माश्या, ना रात्रीला ढेकुण
मच्छरही करती कानाशी, रात्रभर गुणगुण,
जे दिसती चेहर्यावर माझ्या, फोड मोठाले,
पिंपल्स नाहीत् ते, ते आहे, डासांचे ऋण,
चांगली खोली दिलीस देवा मला रहायला-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला, ||ढृ||
रुम पार्टनर माझ्या कानात, रात्र भर घोरतो
इस्त्री करुन ठेवलेले, माझे कपडे घालतो
कपडे घासुन घासुन, लागतो हात दुखायला-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला,
कामावर रोज जातो, दोन बस बदलुन
साहेबाच्या शिव्या खातो, खाली मान घालुन
ऑफिसातल्या पोरी लागतात पाहुन हसायला-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला,
रोज रात्री मेसचे मी, दिव्य जेवण गिळतो
कोरडी चपाती भात, लोणच्यासवे खातो
पैसे शिल्लक रहात नाहीत, रीचार्ज मारायला,-२
चार मजले उतरुन जातो पाणी भरायला,