विभागः राजकारण
देता मते कुणाला खाती बहुत लोणी
मज सुखही न भावे हा दैवयोग आहे !
सांगू कसे कुणाला फळ आपल्या मताचे?
मिळतात भ्रष्ट नेते मज श्राप हाच आहे!
मंत्री जिथे पहावे रुजतात स्वार्थ तेथे
त्यांचेच बोलणेही विपरीत होत आहे!
हा देश, लोकशाही, काहीच आकळेना
स्वातंत्र्य ते मिळोनी मी रिक्तहस्त आहे!
-------------------------------------------
मूळ गीत
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे !
काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !
हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !
दुवा: https://youtu.be/GbZcPzRdMyg
गीत- शांता शेळके, संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी, स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक- हे बंध रेशमाचे, राग- भीमपलास (स्वराविष्कार- रामदास कामत, राम देशपांडे)