विभाग - प्रेम
जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली
चाळीत होय गर्दी, दारी वरात आली
पोस्टात पत्रिकांचे गठ्ठेच मांडलेले
शब्दांत व्याकरणाचे सर्वार्थ गंडलेले
चौकात नववधूची अन् पालखी निघाली
चाळीस शांततेचे बलिदान मान्य होते
ढोलातल्या लयीचे आवेग धन्य होते
वेड्या प्रदर्शनाची वेडी दिठी मिळाली
नव्हतेच शब्द तेव्हा,गर्दीत लोक सारे
स्पर्शात चंद्र कुठला, स्पर्शात उष्ण वारे
अन् थांबला जनांचा ट्रॅफिक भोवताली
जेव्हा तिची नि माझी ठरवून भेट झाली
चाळीत होय गर्दी, दारी वरात आली
----------------------------------------------
मूळ गीतः
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली
दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन् पालखी निघाली
केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली
नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली
दुवा: https://youtu.be/J8hChORTcVo
गीतकार : मंगेश पाडगावकर, गायक : अरुण दाते, संगीतकार : यशवंत देव,