विभागः फजिती
हनुवटी रुतुनी आहे, दिसता खळी दिसेना
सुटले तसेच पोट की टायर हे, हले ना!
कसरत मी करावी म्हणुनीच तू रुसावे
मज श्वास लागतोहे, खिदळून तू हसावे
तुज कीव का नसावी? समजावणी पटे ना
धरिली अशी ही कंबर की चाल चालवेना !
की गूढ काही डाव? भलताच हा प्रसंग!
व्यायाम खोल घाव, जणू असंगाशी संग!
फसलो असा कसा मी, ज्या आपले कळेना?
हनुवटी रुतुनी आहे, दिसता खळी दिसेना
--------------
मूळ गीतः
अजुनी रुसूनी आहे, खुलतां कळी खुले ना
मिटले तसेच ओठ कीं पाकळी हले ना !
समजूत मी करावी म्हणुनीच तू रुसावे
मी हांस सांगताच रडतांहि तू हसावे
ते आज का नसावे ? समजावणी पटे ना
धरिला असा अबोला की बोल बोलवेना !
की गूढ काही डाव ? वरचा न हा तरंग !
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसूनी आहे, खुलतां कळी खुले ना !
दुवा: https://youtu.be/RU5j8CksHZU
गीत- आ. रा. देशपांडे 'अनिल' संगीत - पं. कुमार गंधर्व स्वर - पं. कुमार गंधर्व