विडंबन स्पर्धा प्रवेशिका - सर्वसाक्षी - राजकारण ५

सप्रेम नमस्कार,
समर्थ श्री रामदास स्वामी यांची माफी मागुन आणि आचार्य अत्रे यांना वंदन करुन....

मताचे श्लोक

मताधीश तॊ अर्क रॆ दुर्गुणांचा
सदाभ्रष्ट तॊ दुष्ट कि हीन साचा
करी भाषणॆ बहु मधाळ वाचा
नसॆ त्यामधॆ अंशही वास्तवाचा

सदा सर्वदा भ्रष्ट पंथॆची जावॆ
तरी लक्षुमी पावतॆची स्वभावॆ
मना फंड तॊ मस्त दाबॊनी खावा
जना भार तॊ कर रुपॆ जडावा

प्रभातॆ मनी दाम चिंतीत जावा
सदा दॆणगी वा निधी साचवावा
दुराचार तॊ कधी छापॊनी यॆतॊ
मना क्लॆश त्याचा कदापी न हॊतॊ

मना आसना कम्प हॊऊ नयॆ रॆ
मना पक्षश्रॆष्ठी दुखावु न यॆरॆ
मनी कॆधवा भिती राखू नकॊ हॊ
धनी तॊ पक्षाचा सदा तुष्ट राहॊ

मना मालसंकल्प चित्ती धरावा
धना स्विस बॅंकी सुखॆ पाठवावा
मनी धासती का वसॆ सीबीआयची
पडॆ धाड जरी का तरी हॊय गॊची

नकॊ रॆ मना रॊष वा कारवाई
सुखी ठॆवी सारॆ नॆतॆ नी भाई
नकॊ रॆ मना पॆग तू जास्त मारु
जिव्हा वारु उधळी अति दुष्ट दारु

मना बा वरिष्ठा कचॆरी पुजावॆ
मना आपलॆ स्थान पक्कॆ करावॆ
जरी नावडॆ नम्र वाचॆ वदावॆ
मना पक्ष श्रॆष्ठींस रॆ रिझवावॆ

करॊनी मना त्वा समुदाय गॊळा
बळॆ मार्ग रॊखॊनी रस्त्यात लॊळा
समाजाप्रती दाखवाया उमाळा
मना सज्ज ठॆवी टी शर्ट काळा

जरी व्हावयाचॆ तुला दॆशभक्त
मना तॆही एका रुपयात फक्त
तरी सांगतॊ शॆवटी सॊपी युक्ति
खिशामाजी ठॆवी सदा मॆणबत्ती

सर्वसाक्षी