विडंबन स्पर्धा प्रवेशिका ( परत ये रे मल्ल्या) - आनंद मोरे

--------------------------------------
मूळ गीत - देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
गीतकार - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - आम्ही जातो अमुच्या गावा
राग - नट , भूप
--------------------------------------
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनीं चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा

उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा

स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावि
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावि
मार्ग तुझ्या राउळाचा, मला आकळावा

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा

-----------------------------------------------------
विडंबन विषय - राजकारण
विडंबन गीत - परत ये रे मल्ल्या
------------------------------------------------------
बँकांची तिजोरी, तुझ्याकडे किल्ल्या
परत येरे मल्ल्या आता, परत येरे मल्ल्या

देते कर्ज डोळे मिटूनी जात बॅंकर्साची
मनी तुमच्या का नसे रे भीती आरबीआयची
तू गेल्यावर त्या बँकांना कंप का सुटावा

उजेडात करतो मजा अंधारात मौज
दारात उभी असते तुझिया मॉडेल्सची फौज
अर्धनग्न कॅलेन्डर्सची कसली लोकसेवा

स्वार्थ तुझा देशासाठी ठरतसे विषारी
आपुलाच खास्दार होतो आपुलाच वैरी
तुझ्या कंपन्यांनी कैसा तोल सावरावा

तुझ्या मनी मल्ल्या आता बुद्धी पालवावी
स्वतःहून कर्जे सारी, तुझी तू भरावी
खरा मार्ग व्यवसायाचा, तुला आकळावा

पगारदारांसाठी तू जर स्वार्थत्याग केला
वापरूनी अपुला पैसा मुक्त कर स्वतःला
तुझ्या किंग ऑफ गुड टाईम्स चा करू सारे हेवा

----- आनंद मोरे

------------------------------------------------------