विडंबन स्पर्धा प्रवेशिका - किरण कुमार - फजिती

साहित्य संपादकांनी प्रविशिका ग्राह्य धरणेबाबत आपली मतं द्यावीत असं सुचवतो.

मूळ काव्य /गाणे :

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?
मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ?
हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ?
जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ?
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ?
कवि/गीतकार : श्री सुधीर मोघे , गायक : श्री सुधीर फडके
--------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
विडंबन

शीर्षक : मती मंद झाल्या बायका

मती मंद झाल्या बायका,समजून त्या घेतील का ?

अहोरात्र चंचल ढापणी,बडबडे उगाच कोणी
तो प्रहर काही संपेना,सूटका तूच देशील का ?

तोंडाचे ते फाटणे अन हातात घेशी लाटणे
पतीराजा सांग आज तू उशीरा घरी जाशील का ?

जो जो नको तो जीवनी तो सर्व त्रास देताना
तरीही म्हणे काही उणे हा छळ कधी थांबेल का

(रिचार्ज करतो कितदा तरी मिसकॉल तो सारखा
पेग मारण्या सुखाचे तू सेल बंद करशील का ?)

बोलावल्याशिवायही आली हाडळे जर पुन्हा इथे
संपती सुखाचे क्षण ते आधी तरी कळवशील का ?

किरण कुमार
९०११० २०६२६