नमस्कार मिपाहितैषी जनहो !
गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विशेषदिनप्रसंगात मिपावर वैविध्यपूर्ण आणि सुरेख बॅनर्स पहायला मिळाली. त्यासाठी संबंधितांचे आभार्स ! इथून पुढेही प्रसंगविशेष समयी नवनवीन आकर्षक बॅनर्स पहायला आवडेल. या कामी सर्व साहित्य संपादक आणि आपणापैकी पुष्कळ जण मदत करू शकतील. कुणी स्वतः अगर इतर मिपाकरांनी बनवलेली बॅनर्स सुचवू शकतील. यामुळे चोखंदळ निवडीस मदत होऊन मिपाचे स्वरूप अधिकाधिक आकर्षक व्हावे ही प्रामाणिक इच्छा आहे.
इथे यावर आपण सर्वांनी चर्चा करावी आणि बॅनर्स द्यावीत असे वाटते. धन्यवाद ! :)