झंडा उँचा रहे हमारा!

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/…");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round ;
}

२ डिसेंबर २०१५ ते २२ डिसेंबर २०१५ आमचा न्यूझीलंड-थायलंड दौरा ठरला होता. एका एजंटने थायलंड बुकिंग जसे हवे तसे करून दिले. तिलाच न्यूझीलंडचेही बुकिंग करायला सांगितले. पण आधी ती आणि नंतर मी आजारी झाल्याने ते लांबणीवर पडत गेले. जेव्हा तिच्याकडून न्यूझीलंडचा प्लान आणि थायलंडचे पक्के रिझर्वेशन आले, तेव्हा लक्षात आले की, मी दिलेल्या प्लॅनपेक्षा त्यात बरेच बदल झाले आहेत. थायलंडचे बुकिंग मेक माय ट्रिप या कंपनीतर्फे झालेले दिसत होते.तेव्हा आपण स्वतः जाऊन त्यांना भेटून आपल्याला हवा असलेला प्लान मिळतो का पाहू असे ठरवून मालाड इथल्या त्यांच्या ऑफिसात गेलो. त्यांनी आधी कबूल केले. त्यांच्याशी जवळजवळ पूर्ण दिवसभर चर्चा करून रूपरेषा ठरवली. आठच दिवसात खर्चाची रक्कम ८३,०००० पर्यंत येईल असे त्यांनी कळवले. ही रक्कम आधी त्याच्या ठाण्यातल्या शाखेने दिलेल्या अंदाजापेक्षा २०,००० रुपयांनी जास्त होती, पण आता निघायला महिनाच उरल्याने आम्ही तेही कबूल केले. निम्मी रक्कम रोखीने लगेच भरली. उरलेल्या रकमेचा धनादेशही त्यांनी सांगितलेल्या दिवशी भरला.

काही दिवसांनी त्यांनी फोनवर कळवले की, “दोन हॉटेलांचे बुकिंग पक्के झाले आहे पण उरल्रेल्या दिवसांसाठी खर्च वाढेल”. “किती वाढेल?”, असे विचारल्यावर त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून पायाखालची जमीनच सरकली. मी ओरडलेच, “काय? दोन लाख चाळीस हजार? तुम्ही काय प्रेसिडेंट हाऊसमध्ये बुकिंग करताय की काय आमचं?” “त्याचं काय आहे? तुम्ही इतक्या उशिरा आमच्याकडे आल्याने किंमत वाढतेय.” त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. मी रागानेच उत्तर दिले, “तुम्ही जेवढे पक्के केले आहे, तेवढेच पुरे, पुढचे बुकिंग तुम्ही करू नका. मी पाहीन काय ते.”

नंतर बरेच काही रामायण घडले पण तो या लेखाचा विषय नाही फक्त पूर्वकल्पना येण्यासाठी थोडी माहिती दिली. पाच दिवसांचे पक्के आरक्षणही त्यांनी आम्ही घरातून निघताना आमच्या हातात ठेवले आणि आम्ही धाडस करून पाच दिवसांच्या थायलंडच्या आरक्षणाच्या जोरावर उरलेल्या पाच दिवसांचे आरक्षण नसतानाही न्यूझीलंडच्या दौऱ्यावर निघालो. पाच दिवसांनी हॅमिल्टनमध्ये उतरलो तेव्हा आमच्याकडे कुठल्याही हॉटेलचे आरक्षण नव्हते. तिथल्या बसस्टेशनवर बसून नेट धुंडाळले. माझ्या यादीतील हॉटेलांपैकी 'हॉटेल आयबिस' मध्ये त्या दिवशी जागा उपलब्ध नव्हती. मग दुसरे हॉटेल होते, 'अॅबटस' हॅमिल्टन! तिथे जागा दिसत होत्या. शिवाय दीड कि.मी अंतरावरच ते होते. आता तिथे जाऊन पाहू असे ठरवले, कारण दोन देशांचा दौरा होता. एक लग्न न्यूझीलंडमध्ये आणि त्याच लग्नाचे रिसेप्शन थायलंडमध्ये असल्याने आणि न्यूझीलंडमध्ये उन्हाळा असला तरी आपल्यासाठी ती थंडीच असते. त्यामुळे सामान भरपूर होते. कुठेतरी तात्पुरता आसरा तरी पाहणे गरजेचे होते. तिथेच एका बाजूला टॅक्सीस्टँड होता. तिथे जाऊन टॅक्सी करून अॅबटस, हॅमिल्टनला पोचलो.

तिथली व्यवस्थापक एक मुलगी होती, अगदी विशीबाविशीची. तिच्याशी बोलायला सुरुवात केली. चेक इन टाईम होता दोनचा. आता दहाच वाजले होते. ज्या खोलीचे मला मेक माय ट्रिपने १८० न्यूझीलंड डॉलर्स सांगितले होते त्याप्रकारातली खोली पहिल्या मजल्यावर असून भाडे ८९ असे सवलतीचे होते. शिवाय दुसऱ्या दिवशी राहिले तर १० डॉलर्स अजून कमी होणार होते. आम्ही तळमजल्याची रूम पसंत केली. ज्यात सोयी आम्हाला हव्या तशा होत्या आणि खोली मोठीही होती. तिचे भाडे होते १०९ डॉलर्स. शिवाय या रूमलाही दुसऱ्या दिवसापासून १० डॉलर्स कमी होणार होते. त्या रस्त्यावरच्या ९०% इमारती म्हणजे हॉटेल्स आणि मोटेल्स होती. त्या मुलीने स्वत: जाऊन रूम तयार करून दिली. अगदी जशी फोटोत दिसत होती तशीच. आम्ही तिथे दोन दिवसांचे आरक्षण करून टाकले. बाकीच्या सोयी कशा आहेत ते पाहून नंतर बदल करू किंवा इथेच रहायचे तर आरक्षण वाढवू, असे ठरवले.

Flagचौकशी करताना समजले की हॉटेल मालक चीनी असून सर्व कर्मचारीवर्गही चीनी होता. तिथेच जेवणाचीही सोय होती, नाश्ता राहण्याच्याच किमतीत समाविष्ट होता. थोड्या वेळाने जरा आराम करून फिरायला निघालो. बाहेर पडताना दिसले की, त्या हॉटेलच्या मुख्य इमारतीवर निरनिराळ्या देशांचे दहा बारा झेंडे फडकत होते. त्यात चीनी झेंडा होता, तसेच आपलाही झेंडा होता. परंतु न्यूझीलंडच्या वादळी वाऱ्याच्या जोराने ते सर्व फाटलेले दिसत होते आणि तसेच चिंध्यासकट फडफडत होते. आपल्या झेंड्याच्या थोडा तिरकस असल्याने एक दोनच चिंध्या निघाल्या होत्या.

फाटलेला झेंडा लावणे हा झेंड्याचा अपमान आहे, त्यातून मालक चीनी म्हटल्यावर मी गप्प बसणे शक्यच नव्हते. स्वातंत्र्यसैनिक कै. सी. व्ही.वारद हे दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या नंतर भारतभरात घडलेल्या झेंड्याच्या अपमानाबद्दल जागरूक राहून सरकारकडे तक्रारी नोंदवीत असत. त्यानुसार कारवाई करून वेळ पडलीच तर फौजदारी कारवाई करावी लागत असे. नवरा म्हणाला, “थोडे सबुरीने घे.आपण परदेशात आहोत.” “पण आपण भारतीय पासपोर्टवरच आलोय आणि इथे आपल्याला ओळखणारे खूप लोक आहेत. वेळ पडली तर.” असे त्याला सांगून मी त्या व्यवस्थापक मुलीला बोलावून तिला ते झेंडे दाखवून सांगितलं, “This is wrong, You can’t put my flag like this torn status. This is an insult of me, my flag, my nation too” ती गडबडली,म्हणाली, “I am sorry. I will call my master.
You call him here. I will talk to him, because this is an International issue.” मी ठणकावले.

अर्ध्य तासातच मालक आले. मी त्यांना ते फटके झेंडे दाखवून पुन्हा आधीचेच वाक्य थोडीशी भर घालत म्हटले, “This is wrong, You can’t put my flag like this torn status. This is an insult of me, my flag, my nation too. This is a treasonable offence.” त्यावर त्यांनी उत्तर दिले, “This is only for decoration and we have windy weather in Newzealand here.” आता माझी सटकली. “Look MR. national flags are not things of decoration. They are Pride points. If you want to decorate your hotel by national flags, you should paint them on the wall or you should stick them on the wall properly. But when you unfurl them on flagpole you must conduct the flag code. Each country has flag code and any country does not allow to unfurl torn flag. Not even your country .See, your flag is also torn. If you are not concerned about your flag, I don’t mind, but I mind well about my pride point. My flag! So please change it immediately or if you can't change it now please remove it at first."

मी एका दमात एवढे सांगितल्यावर त्या सद्गृहस्थाने आपल्या कर्मचाऱ्यांना, जे आधीच तिथे उभे होते, त्याच्या भाषेत काहीतरी सांगितले आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या चीनी माणसाने तो झेंडा बदललाच पण आपल्या भारतीय झेंड्याला सॅल्यूटही ठोकला. वर मला हात जोडून भारतीय पद्धतीने नमस्कार करून 'नमास्टे' म्हटले. शिवाय भाडे न घेता पाच दिवस आमचा पाहुणचार केला. एवढेच नव्हे तर पुन्हा कधी आलात तर असेच त्यांच्याकडे रहाण्याची ऑफरही दिली आहे, शिवाय चीनला त्यांच्या घरी येण्याचे अगत्यपूर्वक आमन्त्रणही दिलेय.

“साहसे श्री प्रतिवसति”, असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. मेक माय ट्रिप वरच्या रागाने केले धाडस अंगाशी न येता उलट पैसे आणि आत्माभिमान मिळवून देणारे ठरले. जवळजवळ ५०० न्यूझीलंड डॉलर्स रहाण्याचे आणि खाण्यापिण्याचे तीन/ चारशे न्यूझीलंड डॉलर्स वाचले. अजून एका ट्रिपची सोय झाली नाही का?

चित्र- किलमाऊस्की
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png