ड्राफ्ट - विडंबन काव्य स्पर्धा

सासं नमस्कार.

विडंबन काव्य स्पर्धेचा विचार चालू केलेला आहे. सध्या सुचलेलं स्वरूप इथे टाकतोय. खूप अवकाश आहे पण तरीही सूचना, बदल तुम्ही सगळ्यांनी सुचवा. पहिल्यांदाच असं स्पर्धा घेणं वगैरे करत असल्याने खूप मदत हवी आहे.

काही गोष्टी
१. स्पर्धेला शीर्षक काय द्यावं हे विचाराधीन आहे.
२. मतदान, की निवड पद्धत; काय करावं?
३. कविता कुठल्या द्याव्यात, विचार चालू आहे.

-------------------------------------------
-------------------------------------------

अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है...
अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा...
आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...

काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे.

रंगपंचमीत जशी रंगांची उधळण असते तसेच रंग कवितांच्या विश्वातही असतात. अनेक रंग, अनेक ढंग यांनी हे कवितांचं जग बहरलेलं आहे. त्यापैकी एक रंग असा आहे की जो बोंबा मारत येतो; आणि तो ज्या रंगात म्हणून मिसळेल त्या रंगाला खुलवून टाकतो; आणि एक वेगळाच रंग तयार होतो. विडंबन. रंगीबेरंगी काव्यविश्वातला हा अतरंग. याच रंगात आपण आपलं मिपा रंगवायचंय.

मिपा विडंबन स्पर्धा

विडंबनहौशींनो सज्ज व्हा. विडंबनहौशी नसाल तरीही सज्ज व्हा. स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे असतील.

१. विडंबन खाली दिलेल्या तीन कवितांचं करायचं आहे.
२. तीन पैकी एका किंवा जास्त कवितांचं विडंबन स्पर्धक देऊ शकतात.
३. प्रत्येक स्पर्धक प्रत्येक कवितेचं एकच विडंबन स्पर्धेसाठी देऊ शकतो. म्हणजेच स्पर्धकांसाठी प्रवेशिका मर्यादा तीन असेल.
४. विडंबनाची भाषा मराठीच असायला हवी.
५. मूळ काव्याच्या चौकटीला कमीत कमी धक्का लावून विडंबन केलं जावं. म्हणजेच, वृत्त, मात्रा, गण इत्यादींचे नियम पाळून केल्या गेलेल्या विडंबनाला जास्त मार्क असतील.
६. विडंबनाची भाषा अश्लील नसावी.
७. विडंबनाला समर्पक शीर्षक देणे आवश्यक आहे.
८. कोपरखळ्या, टोमणे चालतील, परंतु व्यक्तिगत टीका, ताशेरे असलेली काव्य ग्राह्य धरली जाणार नाहीत.
९. विडंबन मिपावर पूर्वप्रकाशित नसावे.

विजेता निवडण्याकरता मतदान पद्धत अवलंबली जाईल. तीनही कवितांचे स्वतंत्र धागे काढले जातील व त्यावर ग्राह्य प्रवेशिका प्रकाशित होतील. मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

मग रंग घेऊन तयार असाल तर तुम्हाला रंगवायच्या असलेल्या कविता खालीलप्रमाणे आहेत.

१.

२.

३.

------------------------------------------------------
------------------------------------------------------