२५१ रुपयात मोबाईल !!

‘रिंगिंग बेल्स‘ या कंपनीनी ‘फ्रीडम 251‘ ह्या नावाने स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. उद्या तारीख १८ फेब्रुवारी पासून सकाळी ६ पासून या मोबाईल चे registration सुरु होत आहे.. www.freedom251.com हि वेबसाईट चेक करा
.
फोन ची माहिती:
चार इंचाचा डिसप्ले असलेल्या स्मार्टफोनमध्ये 1.3 गीगाहर्टझचे क्वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच एक जीबी रॅम, आठ जीबी इंटर्नल मेमरी, 3.2 मेगापिक्सेल कॅमेरा.

मी नेट वर वाचलेल्या काही रंजक प्रतिक्रिया.
१) फक्त २५० हा हा हा आकाश ट्याब चे काय झाले ?

२) छान.. आमचे भारतीय तिथे पण भाव कमी करतील.. "१ रुपया राहू द्या हो, देवून टाका न २५० ला, राउंड फिगर करून टाका.."

३) आं ? एवढी तर आमच्याकडे होळीची वर्गणी घेतात राव.

४) काय सांगताय काय ? अहो २५१ मध्ये तर सेम्संग आणि इतर बर्याच मोबाइल चे कव्हर पण येत नाहीत हो. याच कव्हर केवढ्याला आणि ?

५) २ डझन कसे देणार?

६) त्या सोबत चार्जर मिळल का?

७) काही एक्सचेंज ऑफर आहे का? माझा iphone द्यायचा आहे.

आपण पण आपल्या प्रतिक्रिया नोदवा.