काळा घोडा आर्ट फेस्टिवल - २०१६

काळा घोडा कला जत्रा २०१६
काला घोडा आर्ट फेस्टिवल

मुंबईतल्या म्युझिअमजवळ सुरू झालेली ही फेब्रुवारीच्या दुसय्रा आठवड्यात होणारी वार्षिक जत्रा फारच लोकप्रिय होत चाललेली आहे.टाइम्स ग्रुपने सुरू केल्यावर काही वर्षांपुर्वी सहभाग काढून घेतला.इथे कला सोडून इतर सर्व जत्रा असते अशी मध्यंतरी टीकाही झाली होती. आता एचटीमीडिआ -हिंदुस्तान टाइम्स ग्रुप चालू ठेवत आहे.प्रायोजकांनी खूप खर्च आणि पूर्ण सामर्थ्य लावले आहे हे लगेच लक्षात येते.खरं म्हणजे असा काही एखादा चेहरा मुंबईस मिळण्याची गरज आहे.राजस्थानातल्या चारपाच जत्रेंत परदेशी पर्यटक आवर्जून येताना पाहतो.इथे अजून ते येत नाहीत याचे कारण फेब्रुवारी महिना त्यांच्या डायरीत राजस्थान,गोवा,ओरिसा आणि मध्य प्रदेशसाठी लिहिलेला असतो.परंतु मुंबईकर मात्र या जत्रेला आता मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.

याच वेळेस तरुणाईस भुलवणाय्रा व्हलेंनटाइन डे'चे आगमन असते.त्यासाठी लागणारी जागा म्हणून जत्रा हेच योग्य ठिकाण तसेच सुरक्षितही.निरनिराळे कला विक्रीचे स्टॅाल्स असतात.कला महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या कलाकृती आता विशेष गर्दी खेचतात कारण की नवीन चांगले सेल्फी- मोबाइल कॅम्रे. हौशी डिएसएलारकरांना तर त्यांच्या कॅम्य्रासाठी भरपूर खाद्य ( subjects)मिळते. शिवाय "परमिशनही" काढावी लागत नाही.मला माझ्या मोबाइलात पकडता आलेली क्षणचित्रे देत आहे.फोटो काढण्यासाठी झुंबड असल्याने कंपोझिशन वगैरे विसरून जायचे आणि फटाफट दोन चार बाजूने क्लिक करायचं.फोटो कसा आलाय हे बघायचंही नाही कारण मध्येच कोणीतरी फ्रेम बिघडवतं.उंचीचा इथे उपयोग होते.
१ ) मुंबईतला हा भाग ओळखला जातो bull,bear साठी.मात्र इथे सुरवातिलाच अडीच चालीचा पटावरचा घोडा.

२ ) हसय्रा चेहय्रांनाच मागणी आहे.

३ ) चा'वाल्यांचा लोगो

४ ) आज फक्त आराम करायचा.

५ ) नाचरे मोरा

६ ) dear's/deer's eyeview

७ ) मुंबईच्या पाट्या

८ ) चल्ला हवा येऊ द्या स्वच्छ

९ ) तिरछि काली नजरसे बचने के लिए -लिंबू मिरची.

१० ) प्रतिबिंब

११ ) मीटिंग ( meeting of divas)
हल्ली स्टार्सना diva म्हणतात इंग्रजी सिने मॅगझिनवाले.

१२ ) कोणाकडे वेळ आहे का दहा मिनिटं?
बस्तरच्या स्टॅालकडे कुणी फिरकेना.

१३ ) मला या घोड्यावर बसव.
(खरा काळा घोडा पुतळा राणीबागेत नेलाय.)

१४ ) पडली का थंडी मुंबईत?

१५ ) कलेचा हिशोब?

१६ ) छोट्यांसाठी मातीकाम

१७ ) चित्रं काढण्यासाठी बाळे तय्यार

१८ ) किती तो ट्राफिकचा धूर! कोणी मास्क देता का मास्क?( श्रेय नटसम्राट,कुसुमाग्रज)

फोटोंत जे चेहरे पाहतो ते जत्रेत अमुक एक व्यक्ती म्हणून नसतात.ते केवळ एक विक्रेता ,ग्राहक,आनंदयात्री,मनोरंजनासाठी जमलेले नागरिक असतात.एक फोटो मी काढू शकलो नाही -तो म्हणजे व्हलेंनटाइन दिवसानिमित्त बरीच प्रेमळ युगुलं म्युजिअम भागात फिरत होती त्यातील 'ति'च्या डोक्यावर होता छोट्या कागदी गुलाबांचा मुकुट आणि चेहय्रावरचा आनंद.त्यासाठी त्यांना फोटोसाठी विचारावे लागणार होते.हा न काढलेला फोटो कल्पनेनेच पाहा.