तांबडी माती- कथा

तांबडी माती
------------------------------------------------------------------------------------------
आपली मराठी भाषा खूप समृध्‍द आहे. याच समृध्‍द संस्‍कृतीवर कोकणी भाषेने आपला साज चढविला अाहे. कोकणात बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून आहेत, आणि कोकणात जांभा दगडही मिळतो, अशाच या भूमित तांबडया मातीत दाजीसारख्‍या एका सामान्‍य मुलाची ही शिक्ष्‍णासाठी असणारी तळमळ........
-----------------------------------------------------------------------------------------
संध्या काळच्या टायमाक दाजी एकटोच आपलो शाळेत जाणा-या पोरांकडे बगीत व्हहतो, तितक्या्त थय जोश्यां चो दामोदर इलो, आणि तेनी दाजीक हटकल्याान. “अरे दाजी हय काय करतयं, थडे आवसं वाट बगता, जा जा बेगीन जा, नायतर परत भडाकतली.” तसो दाजी उठलो, आणि घराकडे परातलो. घराकडे आवस वाट बघतच व्ह ती तिने त्येणका इचारला, खय रे तू दाजी कितको शोधलो तुका, पनं तु खयचं नाय, मगे दामोदराक पाठयलंय तुका बगूग, हयाबघ बेगीन शेतार जा, भाऊ वाट बगता तुजी. नाईलाजानं दाजी उठलो, आणि शेतार जावक लागलो, तेची आवसं तेच्या र बगून म्हबणा होती, हाली हया पोराचा काय समाजना नाय, खेच्याबतच लक्ष दिसना नाय.
दाजी इचार करत जाय होतो, तितक्या त शेजारच्याक श्याेमानं तेका हाक मारली, दाजीनं मागे वळानं बघितल्या्नं, श्याहमा विचारुक लागलो, खय रे दाजी घाई घाईत जातयं, माझयाबरोबर बोलाकयं सवड नाय. तसो दाजी थांबलो, श्या माकडे वळानं तो सांगूक लागलो, शेतार जातय भाऊ वाट बगत असतलो, आईनं जावक सांगलेला आसा.”शामा वळानं जावक लागलो तसो दाजीनं पटकन इचारलां, “श्याकमा माका पण शाळेत येवचा आसा रे, पण आई तयारच नाय आसा ती म्हनणता, शाळा शिकान काय करतलयं, आम्हीआ बघ काय शिकाक नाय पनं काम करुन कमयतोय मा, शेतार रवशीत तर भाऊच्या कामाक तरी मदत होयत. शेतातली तांबडी माती म्हयणजेच आपली आई आसा. तूच सांग श्याामा माका शिकानसारख्याक दिसता तर मी काय करु. श्याचमाक हेच्यातर उत्तार दिवक जमाक नाय, तो जसो इलो तसो वाटेक लागलो.
दाजी सरळ शेतात इलो, भाऊ तेची वाट बघत थयच उभो होतो. दाजी दिसताक्षणी त्ये नी त्येशका विचारुक सुरु केल्याघन” दाजी मगासपासून मरे तुझी वाट बघतयं, काय करी होतयं इतकोयेळ, आता एक काम कर, बांधार जा आणि शेताक पाणी लाय, जा बेगीन जा.” तरी दाजी थयच घुटमळत होतो, तेका बघून भाऊ ओरडलो,” दाजी ऐकलंस का नाय, काय सांगलय तां.” दाजीक जा बोलाचा होता, ता त्याा बिचा-याक सांगाक येवक नाय, तो तसोच आपलो मुकाटयान पाणी लावक गेलो.
बरोच वेळ भाऊ दाजीची वाट बघत शेतार उभो होतो. दोघांका एकत्रच घराकडे परताचा होता, पण तास झालो, दीड तास झालो, दाजीचो पत्तोर नाय, पाण्यायत पाय घसरान पडाक मिडाक नाय मा, असा भाऊक वाटाक लागला, तसो भियान भाऊ बांधार गेलो, “दाजी, दाजी”म्हमणान भाऊ हाक मारीत होतो, आणि इतक्याबत झुडुपापाठी लपलेलो दाजी तेका दिसलो, दाजीच्या” हातात कसल्याऊतरी विषयाचा पुस्त क होता, तेका बघून भाऊ जो ओरडलो, दाजी थयच पुस्त्क टाकून उभो रवलो, “दाजी, इतको येळ झालो वाट बघतयं तुझी करी काय होतयं, आणि हता काय कोणाचा पुस्त क हता, तुका वाचुक येता” दाजी बावरल्याकसारखो झालो, पण धीर करुन म्ह णालो,” भाऊ, माका शाळा शिकाची हाय हो, मी शेतातला कामय करतय, पन माका शिकानसारख्याह दिसता, तो दामोदर बगा मवो, आणि तेचो भाव तो तर शिकान आता साहेबावानी मिरयता, मग मी........” दाजीचा पुढचा बोलणा पुराच होवक नाय, भाऊची चार बोटा त्यातच्यान कानाखाली उमाटली, दाजी किंचाळलो, आणि तेका तसोच घेवन भाऊ घराकडे परातलो.
भाऊचा डोक्या गरम झाला होता, हातीक धरुन जो तो दाजीक ओढत घेवन इलो तो सरळ, त्येाच्याि आईचया पुढयात टाकल्याोन, “ माये, बग तुझो पोर कसले गोष्टीक करता, शाळा शिकाची आसा म्हीणता, जा भितर जावन आरतीचा ताट घेवन ये आणि ओवाळ, अरे आजपावेस्तो शिकान कोणाचा बरा झालां, त्यात दामोदरच्या बापाशीकडे जमिन आहा, पैसो आसा, म्हाणान ती शिकतत, आमच्यारकडे नाय पैसो, तुझा शिक्षाण कसा पुरा होतला, अरे शिक्शाोन पैसेवाल्यांमनी घेवचा रे गरिबांका ता परवडना नाय.” तितक्याकत दाजी बोलाक लागलो, “ पनं भाऊ सरकारी शाळेत शिक्षण मोफत आसा, आनी पुढच्याड शिक्षणाक स्कॉ लरशिपय गावता, मगे. मीयापन शिकान साहेब जातलयं, आमच्याीकडे पण पैसो येतलो.” दाजी इतक्याी आत्मोविश्वा्सानं सांगू होतो, पण भाऊच्याब आणि आईच्या मनार तेचो काय परिणाम जावक नाय, भाऊन तर कपळार हात मारुन कसलो मेल्याभचो हटट या नजरेनं दाजीकडे बगल्याानं, दाजी तसोच उठान घरात गेलो.
दाजी रोज आपलो शेताच्या बांधार जावून नवीन नवीन पुस्तंक दामोदरकडसून घेवन ये, आणि दामोदरकडूनच वाचीक शिका होतो, भाऊक आणि दाजीच्याप आईक तेचो पत्तोवच नाय होतो. दाजी आता शेतार खराच कामा करत असतलो, असाच ते समजा होते्, पनं एक दिवस भाऊ सहज म्हाणान शेताच्याा बांधार गेलो, बांधावरच्याि लावलेल्याप काजू कलमांच्यावर एक नजर टाकून तो परता होतो, इतक्यामत त्येलका दामोदरची सायकल दिसली, दामोदर काय करता, म्ह णान सहज तेनी बघितल्याोन, तर काय दाजी आणि दामोदर दोघय हातात पुस्तयक घेऊन बसलेले, दामोदर तेका शिकव होतो, आणि दाजी शिका होतो, ता बघून मात्र भाऊ खराच शांत बसाक नाय, तेनी ताडकन दाजीक हाताक धरुन वर उचलल्या नं,” दाजी तुका सांगान पण कळना नाय मरे, अरे आम्हीन मर मर मरतो शेतार ता कोणासाठी, आणि तिया मात्र, अरे इतक्याा वावर आसा तेच्या र लक्ष दी, तर तिया हय पुस्तका घेवन बसलयं, आणि तिया रे दाम्या तुकाय कळना नाय, बाबांका सांगू तुझया, दाजी असोच चल घराक.” म्हणान तेका नेता आणि घराच्याा खोलयेत बंद करता, दाजीच्याा आईक सांगता, “ दाजीक वायचं बरा शिकवचा म्हिटला तर तो आपला ताच खरा करुक चललो, नाय हयो जर असोच वागत असात, तर मी हयेचा तोंडपण बघूचय नाय, सांगून ठेवतय.”
दाजी त्या दिवसाक खूप रडलो. भाऊनं त्याा दिवशी दाजीच्याा आईचापण ऐकाक नाय. पण दुपारी जेवच्या वेळेक भाऊचो जीव मात्र कळवळलो. दाजीक तेनी खोलयेतसुन बाहेर काढल्या नं, आणि तेची समजूत घालत म्हऊणालो,”हया बघ दाजी, अरे काय सांगतो ता ऐक, अरे शेती भाती खूप आसा आमची, पण करणारा कोण नाय, शिवाय पदराक पैसो नाय, तेव्हाे तियाच आता तेच्याखत लक्ष घालूक होयो, अरे ही तांबडी माती आपणांक पुढे पाठी उत्पीन्न‍ मिळवोन देतली, हया ध्या नात ठेय, शिकान काय करुचा आसा, चल आता मुकाटयाने जेय, आनी माझयाबरोबर जोतार चल.” पण दाजी जेयलो, आणि तसोच उठानं पळत पळत बांधार गेलो, भाऊक कळाक नाय, काय झाला तां, तो त्येाच्याो मागार जाय होतो, तर दाजीच्या आईनं तेका रोकला.
दाजी एकटोच बांधार बसान होतो, थयसून शाळेत जाणारी मुला तेका दिसा होती, तितक्या त थयसून शाळेचे मास्त र जाताना दिसले, ते तुकाराम मास्तार होते, दाजीक एकटोच थय बसलेलो बघून ते तेच्या्कडे इले, ”बाळ नाव काय तुझं” “दाजी.” दाजी, अरे शाळेत जायच्यास वेळेला इथं का बसून आहेस.” ”मास्त र, मी शाळेत जात नाही.”” शाळेत जात नाहीस, पण का, घरी कोण कोण आहे तुझया.”” माझया घरात भाऊ आसंत, आणि माझी आई आसा, माका आणखी बहिण भाव वगैरे कोण नाय.” बरं पण शाळेत का जात नाहीस ते सांगितलं नाहीस.””गुरुजी, भाऊ माका शाळेत पाठवक बघनत नाय, माकापण शिकाचा आसा हो, पण भाऊनी आणि आईनं सांगितल्याीनं शेतार कामाक जा, शिकान काय करुचा आसा.””अरे अरे अरे, दाजी काळजी करु नको, मी येतयं तुझया घराकडे तुझया आईला आणि भाऊंना समजावायला, जा आता घरी जा.” मास्ततर घराकडे येवनं भाऊंका समजायतले म्हलणान दाजी खुश झालो, आणि घराकडे परातलो.
घराकडे भाऊ आणि दाजीची आई गोष्टी करत बसलेले होते, दाजी इलेलो बघताच, भाऊन तेका इचारला, ” दाजी पळत पळत खय रे गेल्लेय सांगाच्याो आधी, जा आता खोलयेत जावन बस.” दाजी खोलयेत जावक वळलो, तसे भाऊ आणि आईचे गोष्टी दाजीच्याच कानार पडले. भाऊ सांगा होतो,” सकाळी आना सुतार इल्लोष, तेनी बातमी आणलेल्याभन.”दाजीची आई, ”कसली बातमी”” अगो तुझया चुलत काकाची गजाल, चेडवाक नाय होता बरां, डॉक्टलरकडसून दाखवनं आणलेल्याानं, कसलातरी औषध सांगल्याानं ता तेनी घेतल्याोनं, आणि चेडवाक दिल्याानं, ता घेतल्याेनं, आणि पोरग्या कसातरीच करु लागला मगो.” “ अगो बाये, कसा हो.” “ अगो काय माहिती कसला औषध लिवनं दिला डॉक्टआरांन ता, आधीच तेका काय लिवक वाचूक येना नाय.” दाजीच्यास ध्यािनात हयो सगळो प्रकार इलो, पण तो काय बोलाक नाय चुपचाप खोलयेत जावन बसलो.
बरेच दिस गेले. उन्हाळो इलो, तशी शेतातली कामा परत सुरु झाली, भाऊनं आणि दाजीनं बरीच मेहनत घेवनं शेती फुलयली, पनं बांधावरचा पाणी आटला, आता पाणी कसा दिवचा हयेचो विचार भाऊ करुक लागलो, परत मागच्यार वर्षा सारखी परिस्थिती इली तर. मागच्याय वर्षाक शेताक पाणीच गावाक नाय, आणि पाऊस पण चांगलो पडाक नाय, तेच्यासमूळे सोन्याासारखी पिका बावान गेली. भाऊक काय करुचा ता कळा नाय होता, पण दाजीनं खयसूनतरी बातमी काढली की, ग्रामपंचायतीत फॉर्म भरुन दिलो काय पाण्यायची मशिन आणि पंपसेट वगैरे मिळता. दाजीनं ही बातमी भाऊक सांगितल्याान, तेव्हाश भाऊ आणि दाजी ग्रामपंचायतीत गेले. ग्रामपंचायतीतसून फॉर्म घेतलो, पण फॉर्म भरुचो कसो तो कोणाक माहिती. भाऊन फॉर्म दिणा-याक इचारल्या्न, पण तेका काम होता, म्हआणान तेनी दुस-याकडसून भरुन घेवक सांगल्या न.
भाऊ फॉर्म भरुच्‍यासाठी पुरो गाव फिरलो, गावात शिकलेला कोण तेका मदत करुक तयार नाय, प्रत्येकजण कामात. जोश्यांच्याा दामोदराक विचारला, तर तो शाळेत जावचो बहाणो करु लागलो. आता काय करुचा, भाऊक प्रश्नल पडलो. भाऊक चिंतेत बघून दाजीन शेवटी तो फॉर्म आपल्यााकडे घेतल्यायन. भाऊ चकित होवन दाजीकडे बघीत होतो, तितक्यांत दाजीनं पुरो फॉर्म भरल्याानसुध्दाल. भाऊन दाजीक इचारला,” दाजी तुका बरो मरे फॉर्म भरुक इलो, खय शिकलयं रे. ” दाजी मनातल्या‍ मनात खूश झालो, शेवटी भाऊन एकदाचो तो फॉर्म भरुन ग्रामपंचायतीकडे दिल्याान, आणि भाऊक मदत मिळाली.
भाऊक आता शिक्षणाचा महत्व हळूहळू कळाक लागलेला होता, पण पुरता उमागला नव्हता. असेच एके दिवशी तुकाराम मास्तलर भाऊच्यान घरी इले. भाऊक त्यांआनी आपली ओळख करुन दिली. भाऊन त्येंेका बसाक खूर्ची वगैरे दिली, इकडच्या तिकडच्या गोष्टीा झाल्याावर तुकाराम गुरुजींनी मुळ विषयार बोलाक सुरवात केली, “भाऊ, तुम्हााला एक महत्वाेचा विषय सांगण्यागसाठी मी आलो होतो. भाऊ, तुमच्याी मुलाला दाजीला तुम्हीा शिकायला शाळेत का नाही पाठवत.” ” अवो गुरुजी, हया इतक्या् वावर आसा, आणि शाळा शिकान काय करतलो पोरगो, हयच वायचं शेतात वावरलो, तर घरात अन्नहपाण्यागची तरी सोय होयतं.””चुकतायत तुम्हीे भाऊ, अहो शिकूनच माणसं मोठमोठया पदावर आहेत, आणि दाजीलाही शिकण्यारची खूप आवड आहे, असा गैरसमज करुन घेऊ नका. अहो उदया दाजी शिकला तर या तांबडया मातीत सोने उगवील, शिक्षणाचा उपयोग शेतीत करेल, म्हाणून दाजीला शाळेत पाठवा, हेच सांगायला मी इथे आलो होतो.” भाऊन एकदा दाजीकडे बगल्या नं, दाजी आशेन भाऊकडे बघत होतो. शेवटाक भाऊ काय बोलना नाय तेच्याशर दाजीनचं सांगाक सुरवात केली, “भाऊ, नाय म्हगणू नका, ते दिवशी तुमचो फॉर्म भरुक कोण तयार नाय होतो, पण माका लिवक वाचूक इल्या मुळे तुमचो फॉर्म भरुन दिलयं, आणि चुलत काकाच्याच चेडवाक काकान तारीख बघूच्या आधी औषध दिल्यान, म्हणान तेका त्रास झालो, ताच जर काकाक लिवक वाचूक येत असता तर........”
भाऊक आता पुरता कळान चुकला, आपल्या तांबडया मातीत सोना उगयणारो दाजीच आसा हयेची तेका खात्री पटली, आणि शेवटाक भाऊन दाजीच्या शिक्षणाक होकार दिल्यानं, दाजी आनंदानं उडया मारत मारत दामोदराकडे पळत सुटलो.
पुढे काय झाला, ता माहित करुन घेवचा आसा मा, तर पुढे हयोच दाजी कृषि विभागात मोठया अधिका-याच्या पदार काम करता, आणि तेनी शेतीक प्रगत करुच्यासाठी शासनाचे कितीतरी योजना गावागावात राबविल्यानं, आणि आता गावात तेका सगळे साहेब म्हणान हाक मारतत.
*************************