प्रवासात न्यायच्या पाककृती

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/…");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/…") 10 round ;
}

वर्षातून कमीतकमी दोनदा प्रवासाला जाणे ही गोष्ट आजकाल सर्रास होताना दिसते. यात तरुणवर्गच नव्हे तर वयस्क व्यक्तीही आनंदाने सहभागी होतात. नातेवाईकांकडे राहणे असेल तर जेवणाचा प्रश्न सहजगत्या सुटतो पण मुक्काम हॉटेलमध्ये असल्यास उदरभरणाच्या सर्व वेळा बाहेरचे खाणे वयोवृद्धांस व क्वचित तरुणाईलाही नको वाटू शकते. बाहेरचे खाणे न सोसवणारे लोक असतील तर घरून पदार्थ बांधून नेण्यास पर्याय नसतो. आमच्याकडे बाहेरचे खाणे ज्येष्ठ मंडळीच नव्हे तर आमचे अपत्यही फारसे पसंत करत नाही. प्रवास करताना मुक्कामी पोहोचल्यावर आजकाल हॉटेल्समधील खोल्यांना जोडलेले छोटेसे स्वयंपाकघर असते. तश्या खोल्या तुम्ही आरक्षित करू शकता. दिवसा स्नॅक्स प्रकारात तुम्ही चिवडा, लाडू, तिखटमिठाच्या पुर्‍या व आणखीची फराळाचे पदार्थ नेऊ शकता. दिवस सुरु करताना व दिवसभराच्या फिरण्यानंतर आपले खाणे हे पोषक व झटपट तयार होणारे असले पाहिजे. त्यातील काही पाककृती देत आहे.

पिठले
साहित्य- डाळीचे पीठ (बेसन), तेल, फोडणीचे साहित्य, हिरव्या मिरच्या, कांदे, कोथिंबीर, मीठ, आमसूल, जिरेपूड, सुके खोबरे, लागल्यास लाल तिखट.

कृती-
कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करावी. तेलात मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या घालून परतावे.
मग बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा नेहमीपेक्षा थोडा जास्त परतावा. हवे असल्यास लाल तिखट घालावे.
त्यावर धुवून चिरलेली कोथिंबीर घालावी.
कोथिंबिरीची तडतड थांबली की डाळीचे पीठ, सुके खोबरे घलून मध्यम आचेवर परतत रहावे.
खमंग वास आल्यावर ताटात गार होण्यास हे मिश्रण पसरून ठेवावे.
पिठले पातळ होणार असल्याने त्याप्रमाणे वरून मीठ, एखादे आमसूल घालावे. भाजलेल्या जिर्‍याची पूड, आवडत असल्यास चिमूटभर साखरही त्यात घालावी.

a

पिठले तयार करण्याआधी भात करून घ्यावा. त्याची वाफ जिरेपर्यंत अगदी काही मिनिटात पिठले तयार होते. इनस्टंट पिठल्याचे मिश्रण जितके असेल त्याच्या अडीचपट पाणी पातेली उकळण्यास ठेवावे. उकळी आल्यानंतर आपले हे पिठले मिक्स त्यात घालून नीट ढवळावे. गाठी राहू देऊ नयेत. लागल्यास पाणी थोडेसे घालून झाकून वाफ आणावी. पिठले तयार आहे.

b

कांदा घातलेले मिश्रण एखादा दिवस चांगले राहते. हवा फार उष्ण असल्यास कांदा, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर वापरू नये फक्त लाल तिखट घालावे. मिश्रण गार झाल्यावर साजूक तूप मिश्रणास चोळून डब्यात भरावे व प्रवासास न्यावे.

उप्पीट
साहित्य- रवा, कांदा, कोथिंबीर, मिरच्या, आलं, कढीपत्ता, उडीद डाळ, सुके खोबरे, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य.
कृती-
प्रथम कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हिरव्या/ सुक्या मिरच्यांची फोडणी करावी.
त्यामध्ये उडीद डाळ घालून हलवावे व लगेच कांदा घालावा.
कांदा झाकण न ठेवता परतावा, आल्याचा कीस परतावा. धुवून चिरलेली कोथिंबीर परतावी.
मग रवा घालून रंग बदलेपर्यंत परतावे व त्यात सुक्या खोबर्‍याच्या कीस घालावा.
मिश्रण परतून ताटात गार होण्यास काढून ठेवावे.
कोमट असताना लिंबाचा रस घालून एकत्र करावे म्हणजे पाण्याचा अंश उडून जाईल.
रवा गार झाल्यावर त्यात मीठ, साखर, चमचाभर साजूक तूप घालून एकत्र करावे व डब्यात भरून प्रवासास न्यावे.

c
उप्पीट करण्याआधी रव्याच्या मिश्रणाच्या दुप्पट मापाचे पाणी गरम करण्यास पातेल्यात अथवा मायक्रोवेवमध्ये ठेवावे. पाण्यास उकळी आल्यावर मूठभर फ्रोजन मटारचे दाणे घालावेत. रव्याचे मिश्रण पाण्यात घालून नीट ढवळून वाफ आणावी.

d

खिचडी

साहित्य- तांदूळ, मूगडाळ, फोडणीचे साहित्य, कढिपत्ता, मिरच्या, गोडा मसाला, लाल तिखट, मटार, मका, कोथिंबीर, सुके खोबरे इ.
कृती-
तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी.
त्यात कढीपत्ता व आवडत असल्यास हिरव्या मिरच्या घालाव्यात, आवडीप्रमाणे मटार, मका घालावा.
जरा परतून डाळ तांदूळ, धुवून चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतावे.
त्यात सुके खोबरे, गोडा मसाला व इतर मसाले आपल्या आवडीनुसार घालावेत.
मिश्रण ताटलीत गार होण्यास काढावे. अंदाजाने मीठ घालावे.
गार झाल्यावर साजूक तूप चोळून कोरडी खिचडी डब्यात भरून प्रवासास न्यावी.

e

करतेवेळी पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवावे. उकळी अल्यावर त्यात खिचडीचे मिश्रण घालून आधी मध्यम व नंतर मंद आचेवर वाफा आणाव्यात.
मऊ मोकळी खिचडी वाढावी. बरोबर मायक्रोवेवमध्ये भाजलेला पापड, घरून नेलेले लोणचे वाढावे.

किचनेटची सोय असलेल्या हॉटेलच्या खोलीत सहसा छोटा फ्रीजही दिलेला असतो. त्यात मी मटारचे दाणे ठेवते. तशी सोय नसल्यास मटार नेऊ नयेत. मुक्कामी गेल्यावर जवळच्या ग्रोसरी स्टोअरमधून २ टोमॅटोज, एखादा कांदा, दह्याचा डबा घेऊन फ्रिजमध्ये ठेवते. खिचडी शिजेपर्यंत ऐनवेळी कोशिंबीर करून वाढता येते.
हा पदार्थ मायक्रोवेवमध्येही होऊ शकतो.
f

दशमी
साहित्य- कणिक, थोडे मीठ व थोडे तेल. कणिक भिजवण्यास दूध.
कृती-
कणकेत मीठ, तेल घालून कालवावे. गार दूध लागेल तसे घालून नेहमीप्रमाणे कणिक मळावी.
पंधरा ते वीस मिनिटे तेलाचा हात लावून झाकून ठेवावी. आता कणकेच्या नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्यात.
गार झाल्यावर डब्यात भरून घ्याव्यात. या पोळ्या प्रवासात नेल्यास गार असतानाही मऊ राहतात व चविष्टही लागतात.
अशाचप्रकारे पाणी व दूध (किंवा फक्त पाणी) यांचे मिश्रण उकळून त्यात किंचित मीठ घालून ज्वारी, तांदूळ किंवा बाजरीचे पीठ घालावे व मोदकासाठी काढतो तशी उकड काढावी.
मिश्रण कोमट झाल्यावर मळून उंडे तयार करावेत. नेहमीप्रमाणे भाकरी करून तव्यावर व थेट गॅसवर भाजाव्यात. भाकरी भाजल्या जाण्यास थोडा वेळ लागतो पण अगदी मऊ राहतात..

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png