२०१५ मधे आणि २०१६ च्या सुरुवातीला आपण खुप चांगल्या लेखमाला, अंक आयोजित केले. काही विशेषांकही आले. तसचं काम अजुन पिन पॉईंट प्रिसिजननी ह्या वर्षीही करायचं आहे. गेलं वर्षं सा.सं. मंडळासाठी पहिलं वहिलं होतं त्यामुळे (माझ्यामते) गडबडगोंधळ उडाला होता, पण सर्वांच्या सहकार्याने सर्व लेखमाला आणि अंक वेळेवर आणि दर्जेदारपणे वाचकांपर्यंत पोहोचलेले आहेत.
ह्यावर्षी आपण अजुन चांगलं नियोजन करुन गडबडगोंधळ टाळुन हे उपक्रम आयोजित करायचा प्रयत्न करुयात. सद्ध्या झालेल्या बोलण्यांप्रमाणे खालचे उपक्रम २०१६ मधे आयोजित करायचे आहेत.
१. शतशब्दकथा स्पर्था- मी
२. दिवाळी अंक २०१६- आदुबाळ
३. महाराष्ट्र दिन विशेष- अजया ताई आणि स्रुजा
४. होळी/ शिमगा- वेल्लाभट
५. मराठी दिन- अजया ताई
६. छायाचित्र स्पर्धा आणि हॉल ऑफ फेम- श्रीरंग_जोशी
७. श्री गणेश लेखमाला - स्नेहांकिता
अजुनही काही उपक्रम डोक्यात आहेत जसं की आरोग्य लेखमाला, प्रवास लेखमाला वगैरे. ते सविस्तरपणे ठरवु. इथे चर्चेने तारखा ठरवु. अजुन काही सुधारणा किंवा उपक्रम आयोजित करता येणार असतील तर ते इथे बोलुन ठरवु.