विकिमिडीया कॉमन्स हा सर्व भाषातील विवीध विकिप्रकल्पांसाठी मिळून वापरता येण्या जोगा आणि मुख्य म्हणजे कॉपीराईट मुक्त असलेल्या छायाचित्राच्या आंतरजालावरील मोठ्या संग्रहांपैकी एक आहे. आंतरजालावरील इतर छायाचित्र संग्रहाच्या वेबसाईट्सपे़क्षा उपलब्ध छायाचित्रे कॉपीराईट मुक्त आहेत का हे बघण्याची स्वयंसेवकांची जागरुकता विकिमिडीया कॉमन्सवर त्या मानाने बरी आहे. त्यासही काही मर्यादा पडत असव्यात नाही असे नाही त्याबद्दल पुन्हा केव्हातरी या धाग्याचा मुख्य उद्देश विकिमिडीया कॉमन्सवरची आवडलेली छायाचित्रे अधून मधून मिपाकरांसोबत शेअर करणे हा आहे. -अर्थात मी ती वेळोवेळी बदलत राहीन.
खालील बहुतेक चित्रे कॉपीराईट मुक्त असणे अभिप्रेत आहे तसे नसेल तर विकिमिडीया कॉमन्सवर ती वगळली जाण्याबाबत सुचीत करण्यात सहकार्याचे स्वात आहे. असो.
पूर्वबालीतील एक सुर्योदय
श्रेय

आमेरीकन ओकमुलगी पार्कातील एक सकाळ

आणि आता निसर्ग विरुद्ध विकास या फ्रान्समधील एका जलसिंचन प्रकल्पाला विरोधकरणार्या मागच्या वर्षीच्या आंदोलनात एका फ्रेंच आंदोलकाचा मृत्यूच्या घटनेबद्द्ल एक क्लिप श्रेय
हा क्लिप फॉर्मॅट का दिसत नाही या बद्दल जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
श्रेय विषयक दुवे निट दिसत नाहीत पुढच्या प्रयत्नात अद्ययावत करेन.
आपण स्वतः क्लिक करुन काढलेली छायाचित्रे विकिमिडिया कॉमन्सला कॉपीराईट मुक्त स्वरुपात दान करून विकिप्रकल्पांना अप्रत्यक्षपणे साहाय्यभूत होऊ शकता. छायाचित्र चढवण्यासाठी मराठी साहाय्य दुवा
आणि एका समुद्र किनार्यावरील एक सकाळ

श्रेय By Rossana Ferreira from Viana do Castelo, Portugal (Good Morning) [CC BY 2.0 (http://creativecommons.org/licenses/by/2.0)], via Wikimedia Commons