सकाळची मुंबै

तीन वर्षांआधी एका सकाळी माझा कॅमेरा कॅनन १०००डी आणि किट लेन्स १८-५५ घेऊन सकाळची मुंबई कशी असते हे शोधायला निघालो. निमित्त होते परदेशी पर्यटकांना मुंबईचं पर्यटन वेगळ्या पद्धतीने घडवणार्‍या एका कंपनीच्या वेबसाईटचं. त्याची डीझाईन व डेवलपमेंट मीच करत होतो. (काही कारणाने ती अजुन पुर्ण झालेली नाही.) फोटोही मीच काढावे असे ठरले. त्यानुसार त्या सकाळी दोन विषय निश्चित केले. जे त्यांच्या दोन टूरवर आधारित होते. मुंबई बाय मॉर्निंग आणि दादर फ्लावर मार्केट. ह्यातले काही फोटो वेबसाईटवर वापरले गेलेत. सर्व फोटोंचे एक कलेक्शन म्हणून 'मुंबई मॉर्निंग : बाय संदिप डांगे' हा अल्बम बनवला. त्यातलेच काही निवडक फोटो. बाकीचे ह्या दुव्यावर बघता येतील. बरेच मिपाकर मोबाईलवर बघतात म्हणून ही काळजी.

असो.

१. मुखपृष्ठ
1

२. ताजा खबर
2

३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
3

४. मछली का पानी!
4

५. सकाळ आणि संध्याकाळ
5

६. डिवायडर
6

७. बन मस्का अ‍ॅट गेटवेऑफइंडिया
7

८. दान...
8

९. दगडी शिल्प : फुले मंडई
9

१०. मटनमार्केट
10

११. आकाशकंदिल
11

१२. पाण्याचा टँकर
12

१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
13

१४. बोराबाजार, फोर्ट.
14

१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
15

१६. सुशेगाद
16

१७. आज किती मजूरी मिळणार?
17

१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
18

(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)

धन्यवाद!