नवीन सल्लागार व व्यवस्थापक

नमस्कार,
सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. आज मिसळपाव संबंधीत दोन महत्वाच्या घोषणा करीत आहोत. काही मिपाकरांचे खाते शिस्तभंगामुळे काही काळासाठी गोठवले होते त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत.

मिपाच्या सल्लागार मंडळात यापुढे प्रा.डॉ. दिलीप बिरूटे, पैसा, आणि आनंदयात्री सहभागी होत आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा मिपाला आता पर्यंत फायदा झालाय. यापुढील काळात यांच्या सहकार्याने मिपाची प्रगती होईल अशी आशा आहे.

यापुढील सहा महिन्यांसाठी मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार प्रशांत यांचेकडे असतील. मिपाच्या संबंधीत कुठलाही व्यवस्थापकीय, धोरणात्मक निर्णय प्रशांत घेतील. नीलकांत येत्या सहा महिन्यांसाठी कामातून रजा घेतोय.

- नीलकांत