लोनाड : लेणी आणि शिवमंदिर

शान्तिप्रिय यांचेकडून त्यांच्या लोनाड (जानवल) ची बौद्ध कालीन लेणी आणि शिवमंदिर . या लेखातून स्फूर्ती घेऊन लोनाडला भेट दिली.त्या धाग्यात फोटो बरेच होतील म्हणून लोनाड लेणी आणि शिवमंदिरचे मोबाइल ने काढलेले फोटो या वेगळ्या धाग्यात इथे देत आहे.

लेखामध्ये फोटो त्या वेळी tinypic_dot_com siteवरून टाकले होते. ती साइट सेप्टेंबर २०१९ ला बंद झाली. ( फोटोबकेटने घेतली. ) त्या अगोदर फोटो डाउनलोड न केल्याने बाद झाले. आता (२०२० जुलै ) गूगलवरून काही मोजके देत आहे.

फोटो १)
उजवीकडचे एक मोठे शिल्प.

फोटो २)
दालन

फोटो ३)
गणेश ,आताची मूर्ती आहे.

फोटो ४)
खांब.

फोटो ५)
शिवमंदिर ,जानवल. पुढचा गोल भाग नाट्यमंडप सुचवतो.

फोटो ६)
शिवमंदिर ( जानवल). तलावासाठी नुतनीकरण आराखडा.

फोटो ७)
शिवमंदिर ( जानवल).
वीरगळाचा उंबरठा केला आहे असे वाटेल. पण तसे नाही. कारण तिसरे छोटे शिल्प 'लज्जागौरी'चे आहे. संतती होण्यासाठी शंकराची लिंगपूजा >> उपवास आणि नवस करणारा भाविक >> लज्जागौरी . याची पूजा इथे होत असावी. तो मंडप वेगळा आहे.

जावे कसे?
१) मु्ंबई -ठाणे -नाशिककडे जाणाय्रा भिवंडी बाइपास रोडने - पांजरापोळ - उजवीकडे - लोनाड टेकडी.
२) कल्याणपर्यंत रेल्वे - पडघा/आमणे बसने - सावद फाटा(१० किमी) - डावीकडे -दोन किमीवर ओटो रिक्षाने लोनाड टेकडी. कल्याण-पडघा बस दर वीस मिनीटांनी असतात.
रस्ते उत्तम आहेत.
पडघा येथे चंद्रपूरची वीज येते.रविवारी बाजार असतो.मे महिन्यातले शेवटचे रविवार मोठे बाजार असतात.सुकट,भात लावणीची डोरली वगैरे गावकरी खरेदी करतात.खडवली रे स्टेशनपासून चार किलोमीटर आहे.सकाळी खडवली-नदीकाठचा स्वामीमठ-पडघा-लोनाड -कल्याण असे करता येईल.