रोझ शो २०१६ (१)

दरवर्षी रोझ सोसायटी ऑफ पुणे यांचेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे गुलाबांच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन अर्थात रोझ शो आयोजित केले जातात. यावर्षीचे हिवाळी गुलाब प्रदर्शन २ आणि ३ जाने.२०१६ ला होते, आणि हे सोसायटीचे ८९वे गुलाब प्रदर्शन होते हेही एक विशेष.

हे अप्रतिम गुलाबांचे प्रदर्शन तारखा न कळल्यामुळे किंवा इतर कारणास्तव नेहमी बघायचे राहून जाते, यावेळेस मिपाकर कंजूस यांनी खफवर आठवण करून दिल्यामुळे जाऊन बघण्याचा योग आला, त्यासाठी त्यांचे विशेष आभार !!

जयंतराव टिळक यांच्या हस्ते १९६२ साली रोझ सोसायटी ऑफ पुणे ची स्थापना झाली, ही भारतातील पहिली फक्त गुलाबांसाठी स्थापन झालेली सोसायटी आहे, त्यांचे जवळपास एक हजार सभासद आहेत. सोसायटीचा प्रमुख उद्देश्य लोकांच्या मनात गुलाब लागवडीविषयी प्रेम आणि जिव्हाळ्याची बीजे पेरणे हा आहे. सोसायटी सभासदांना गुलाब लागवडीसाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि मदत करत असते, त्यांची सर्व माहिती असणारी 'गुलाबमित्र' ही पुस्तिका तिथे प्रवेश करतांना देण्यात येत होती. तिथेच टिळक स्मारक मंदिर मध्ये मागील बाजूस फुलांची रोपे, कंद,खत, बी-बियाणे, खाद्यपदार्थ इ. वस्तुंची विक्रीही सुरू होती.

साधारण दीडशे प्रकारचे २५०० गुलाब एकाचवेळी एकाच ठिकाणी बघायला मिळाले ही एक पर्वणीच. सहसा बघायला न मिळणारे, वेगवगळ्या रंगछटा असणारे गुलाबांचे नानाविध प्रकार मन मोहून घेत होते. ही फुलं डोळे भरून पाहण्यात खूपच आनंद होता, हे बघू का ते असं झालं होतं, मन भरतच नव्हतं. तरीही त्यातून जमेल तशी बरीच छायाचित्रं काढण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यात दरवर्षी फळं-फुलं भाजीपाला प्रदर्शन संभाजी पार्कमध्ये आणि फुलांचे प्रदर्शन एम्प्रेस गार्डनमध्ये (यावर्षी २२-२४ जाने २०१६) भरत असतात, ही अत्यंत प्रेक्षणीय आणि अजिबात न चुकवण्याजोगी अशी प्रदर्शनं असतात. तेव्हा पुढच्या वेळेस यातील कोणत्याही प्रदर्शनाची तारीख कळली की खास वेळ काढून नक्की पहायला जावे, डोळे आणि मन तृप्त होतील याची १००% गॅरंटी.
(भाग १)

१.
r1

२.
r2

३.
r3

४.
r4

५.
r5

६.
r6

७.
r7
८.
r8

९.
r9

१०.
r10

११.
r11