सहज आणि सोपे फुड कार्व्हिंग - भाग १

carving 1

फुड कार्व्हिंग.... लग्न/मुंजीत/पार्ट्यांमधे अगदी नावारुपाला आलेला प्रकार. एक प्रकारचं स्टेट्स सींबॉल म्हणाना!

कार्व्हिंगची सुरवात कधी आणि कशी झाली हे जाणून घेण्यात मी काही विषेश रस घेतला नाही कारण हे काम आत्तापर्यंत अगदी अशक्यच वाटत होतं. पण आधीच हव्याश्या वाटणार्‍या फळं आणि भाज्यांना विविध प्रकारे कोरुन त्यांना अधीक आकर्षक / प्रेझेंटेबल करु शकतो ही कल्पनाच किती उत्साही आहे!! म्हणून जालावर जरा उलथापलथ केली असता हे अशक्य वाटणारं काम आता सोपं आणि आवाक्यातील वाटू लागलं.

अर्थात कार्व्हिंग अधीक सुबक, रेखीव येण्यासाठि ह्यांची विशेष टुल्स (हत्यारं??) असतात. पण आपलं काय हॉटेल नाही की दर दिवसा आड होणार्‍या पार्ट्या नाहीत. मग अजून शोध घेतल्यावर उमगलं की काही कार्व्हिंग्ज ही रोजच्या वापर्‍यातल्या सुरीने देखील होण्यासारखीच आहेत त्यासाठिच हा लेखनप्रपंच. हां पण सुरी धारदार असेल असं बघा.

टुल्स (हि सुद्धा ईन जनरल आहेत कारण जालावर पण विविध नमुने बघायला मीळाले): खालील चित्रे जालावरुन साभार!

carving 2

भोपळा, कलींगड हि तर कार्व्हिंगच्या क्षेत्रातील हमखास फळं. अशक्यप्राय आणि करू तितकं कमी ईतक्या अगणित कल्पना ही दोन फळं देतात. त्याचेच काही नमूने:

carving 3 carving 4

चला तर मग सहज/सोपे कार्व्हिंग शीकून घरी येणार्‍या पाहुण्यांची वाहवा मिळवूया. अर्थात धीर आणि चीकाटीने प्रयत्न करा.
सुरवातीला जSSSरा कठिण वाटेल पण अशक्य नक्किच नाही. विश यू ऑल द बेस्ट!

सुरवात आपण फुलं आणि पानांपासून करुया.

१. टोमॅटोचे गुलाबः
ह्यासाठि कडक आणि लालबुंद टोमॅटो घ्या. डाव्या हातात टोमॅटो धरुन उजव्या हाताने टोमॅटोच्या बुंध्याकडच्या भागाने त्याची एकसंध साल काढत माथ्यापर्यंत या. आता गुलाबासाठि वेटोळे दोन पद्धतीने करता येतात. १. माथाकडच्या भागाने सालाची गुंडाळी करत शेवट्च्या भागापर्यंत या किंवा २. सपाट पृष्ठभागावर माथ्याकडचा भाग ठेवा. त्यावर बोट ठेवून बोटाला सालांची वेढे घाला. ह्यातली दुसरी पद्धत जास्त सोपी आहे कारण गुंडाळी करताना सालांना पाणी सुटल्याने हातातून सटकतात.

टिपः गुलाबांवर दवाचा ईफ्केट देण्यासाठि मीठ भुरभुरवा (अर्थात डिसप्ले/शो करण्याआधी अन्यथा मीठामूळे पाणी सुटेल). नंतर मीठ घालून खाताना हे माझ्या लक्षात आलं.

carving 5 carving 6

carving 7

२. पानं:
काकडीचे दोन तिरके काप घ्या. मध्यभागी सुरीने चीर द्या (दोन्ही टोकं शाबूत ठेवून). मग मध्यभागच्या शीरेपासून दोन्ही बाजूंना चीरा द्या.

carving 8 carving 9

३. काकडीचं फुलः
फुलासाठी बुंध्याकडचा भाग कापून घ्या म्हणजे फुलाला बेस मिळेल. आता फुल कितपत उंच हवाय ते ठरवून सुलटा "V" आणि उलटा "V" ह्या प्रकारात काकडीला खोल खाचा मारा. प्रत्येक शेवटची खाच ही पहिल्या खाचेला मिळेल असं बघा. शेवटची खाच पुर्ण झाली की काकडी अलगद विलग होईल. कृपया जोर देउन काकडी खेचू नका. शेप बिघडेल. काकडि सहज विलग होत नसेल तर मारलेल्या खाचांमधून परत एकदा सूरी फिरवा. आता हलक्या हाताने पाकळ्या विलग करा. ह्यासाठी सुरी अगदी पुढे दोन बोटांच्या मधे पकडा (हात कापणार नाही हे सांभाळुन). एका मध्यम काकडित साधारण चार फुलं होतील.

टिपः सॅलेड प्लॅटर सर्व करताना अशी काकडिची फुलं पाहुण्यांना नक्किच आकर्षीत करतील.

carving 10 carving 11

carging 12

पार्टि आणि पाहूणे ओसरले की केलेल्या कलाकृतीवर मीठ/मीरपूड किंवा चाट मसाला घालून फडशा पाडा.

carving 13