साहित्य: ओरिगामी पेपर (दोन्ही बाजूने रंगीत),कटर,stapler
१. प्रथम कागद चौकोनी दुमडून घ्या.
२. कटरच्या मदतीने चौकोन कापून घ्यावा.
३. आता चौकोन मध्यभागी दुमडून घेऊन त्याची चौकोनी घडी घाला.
४. आता घडी उघडून ह्या चौकोनाचे सम चार भाग करावे.(कटरच्या मदतीने)
५. प्रत्येकी चौकोनाचे परत दोन समान भाग करावे. म्हणजे ८ पट्ट्या मिळतील.
६. एक पट्टी उभी, त्यावर एक आडवी पट्टी ठेवावी.(अधिक चिन्ह)अशा रितीने ८ पट्ट्या रचून घ्याव्या व stapler च्या मदतीने मध्यावर जोडून घेणे. (पिन तिरकी लावा)
७. ह्यानंतर पहिली पट्टी कृतीत दाखविल्या प्रमाणे दुमडून घ्या.
८. दोन्ही बाजू दुमडून पहिली पट्टी अलगद वर उचलून घ्या.
९. ह्या पट्टीचे दोन्ही कोन आतल्या बाजूस दुमडून घ्या.
१०. कोणतेही एक टोक पकडून त्याची गुंडाळी करा. हा गुलाबाचा मध्य भाग आहे.
११. दुसऱ्या पट्टीचे दोन्ही टोक बाहेरच्या बाजूस बोटाच्या मदतीने वळवून घ्या. विरुद्ध बाजूस हीच कृती करावी. नंतर ह्याच पट्टीचा मध्यभाग बोटाच्या चिमटीत पकडून पाकळ्या वर उचलून अलगद दुमडावे. कृती बघा.
१२. अशा रीतीने सर्व पाकळ्या दुमडून घ्याव्या. प्रत्येक वेळी पाकळ्या मध्यभागी घट्ट दुमडाव्या.
गुलाबाचे फुल तयार!!!!!