विज्ञान लेखमाला आवाहन

नमस्कार मंडळी,

शशक स्पर्धा, श्री गणेश लेखमाले नंतर आम्ही घेऊन येत आहोत : विज्ञान लेख माला. आधीच्या २ उपक्रमांप्रमाणेच याही उपक्रमाला तुमच्या सहभागाशिवाय शोभा येणार नाही. तुमच्या भरघोस आणि उत्साही प्रतिसादाची आस धरुन आज आम्ही ही घोषणा करतो. जगभरातले शास्त्रज्ञ, भारतीय विज्ञान परंपरा, वहिवाटी पेक्षा वेगळ्या विज्ञान कक्षा, विज्ञानातल्या गंमती जंमती अशा अनेक विविध विषयांवर आम्हाला लेखन अपेक्षित आहे. लेखमालेचा पहिला लेख २६ जानेवारी ला प्रकाशित होईल आणि लेख येण्याची शेवटची मुदत असेल १५ जानेवारी.

सर्वोत्तम लेख निवडण्याचं काम सासं मंडळ करेल. जे लेख निवडले जाणार नाहीत त्यांना नेहमीप्रमाणेच मेन बोर्डाचं व्यासपीठ खुलं असेल.

या वेळी आम्ही एक गुगल फॉर्म बनवला आहे. इच्छुकांनी या प्रवेशिका आधी भरुन द्याव्यात जेणेकरुन आम्हाला फॉलो अप घेणे, लेखमालेच्या आवाक्याचा अंदाज येणे, त्यासाठी अनुक्रमणिका बनवणे इत्यादी कामांना सुरुवात करता येईल. या प्रवेशिकांची अंतिम मुदत आहे २७ डिसेंबर.

लेख पाठवताना ते साहित्य संपादक या आयडी वर व्यनि करुन पाठवावेत.

गुगल फॉर्म या दुव्यावरुन बघता येईल.

विषयांची यादी फॉर्म मध्ये देखील बघता येईल, शिवाय इथे ही डकवली आहे.

१. प्राचीन आणि अर्वाचिन ऋषी (वैज्ञानिक आणि त्यांच्या सुरस कथा)
२. आर्यभट्टाचे वारस (भारतीय विज्ञान परंपरा - आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणितज्ञ , सर्व प्रकारचे संशोधक)
३. विज्ञान सूक्त (मूलभूत विज्ञान संशोधनावरील (Pure science researchवरील) लेख प्रामुख्याने यावेत. astrophysics , chemistry, geology, maths, material sciences, oceanography, operations research , physics, statistics, agricultural science, biochemistry, bioinformatics, biomedical science / engineering, biophysics, biotechnology, botany and environmental science)
४. विज्ञानस्य कथा: ( खुसखुशीत माहिती, विज्ञानातील गमतीजमती - उदा. चार्ल्स गुडइयरला लागलेला व्हल्कनाइज्ड रबरचा शोध, केक्युलेला स्वप्नामध्ये सापांची रिंग दिसल्यामुळे लागलेला बेन्झीन रिंगचा शोध इ. असे, पण काहीसे अप्रसिद्ध. सेरेंडिपिटीने लागलेले शोध वगैरे.
५. हे माहिती आहे का? (सर्वसामान्यांना फारसे माहीत नसलेले विषय - उदा. 'इथॉलॉजी' (Ethology - प्राण्यांचं स्वभावशास्त्र) यासाठी अजुन चांगलं नाव सुचतंय? मी "दृष्टीआड ची सृष्टी" चा विचार करत होते पण ते खगोल शास्त्रा शी जास्त संबंधित वाटतं किंवा तत्सम विषयाशी
६. समांतर वैज्ञानिक ( विज्ञानप्रसार करणार्‍या व्यक्ती - संस्थांबद्दल - उदा. अरविंद गुप्ता, मराठी विज्ञान परिषद, TIFRचा 'Chai & Why' उपक्रम
७. राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान
८. विज्ञानाचा भस्मासूर ( वैज्ञानिक शोधांचे विध्वंसक उपयोग उदा: अणुबाँब)
९. अद्भुत विज्ञान ( पिरॅमिड्स, आश्चर्यचकीत करणारे काही वास्तुशिल्पं, काही घटना, काही शोध ई. )
१०. इतर

चला तर मंडळी, कामाला लागुयात. एकाहुन एक सरस आणि सकस लेखमाला आजवर आपल्यातल्या गुणी लेखकांच्या जीवावर मिपाने सादर केल्या. ही लेखमाला देखील त्याला अपवाद नाही.

तुमच्या भरघोस प्रतिसादांच्या प्रतिक्षेत ,

-साहित्य संपादक मंडळ