या लेखमालेसंबंधित चर्चा इथे करुया.
स्रुजा ही जबाबदारी घेते आहे. आधीच्या धाग्यातली चर्चा इथे पेस्ट करते आहे.
कलामांचं योगदान आणि त्यांच्यासारख्याच इतर अनेक शास्त्रज्ञांचं भारतातलं योगदान हा विषय कसा वाटतोय? या निमित्ताने आपल्या वैज्ञानिक परंपरेची पुन्हा ओळख होईल. आजच्या काळातही अनेक प्रथा, विश्वास, रुढी यांना आपल्यातले अनेक जण चिकटुन बसले आहेत. या निमित्ताने अशा योगदानाची सांगड त्यावर भाष्य करण्यासाठी घातली तर ते प्रसंगाला अनुरुप राहील. मिपाकडुन डॉ. कलाम यांना एक आदरांजली असं याचं स्वरुप ठेवु शकतो.
लोकांना लिहीते करणे या उद्देशात पण भर पडेल. सुचना, सुधारणा जरुर सांगा. अजुन मी पण यावर विचार करते आहे म्हणुन वेगळा धागा काढला नाही. पण काढेन तो पण.
या निमित्ताने त्यांनी ज्या मुल्यांना जपलं त्याबद्दल लिहीलं तर ते अधिक संयुक्तिक होईल. व्यक्ती पुजेचं स्वरुप त्याला नको यायला.
या निमित्ताने आपण आधुनिक भारताचे ऋषी अशी लेखमाला सुरु करुयात. कलाम यांच्याबद्दल आणि त्यांच्यासारख्याच इतर संशोधकांच्या, वैज्ञानिकांच्या, आधुनिक भारताच्या प्रवासात जे माईलस्टोन्स ठरले त्यांच्याबद्दल लिहायला उद्द्युक्त करु. सी व्ही रमन, नारळीकर, होमी भाभा, रामानुजन, विक्रम साराभाई या सर्वांमध्ये एक समान धागा होता तो म्हणजे ज्ञानाची ओढ आणि दूरदर्शी नजर. अनेक लोकं जेंव्हा आज भारताबाहेर आपलं कर्तृत्व दाखवुन ऐन वेळी राजकारणी मतं प्रदर्शित करुन फुटेज खायच्या मागे आहेत तेंव्हा अशा लोकांची आठवण रीफ्रेशिंग ठरु शकते. त्यांच्यासारखी माणसं आपल्यामध्ये आणि आपलयासारख्याच परिस्थिती मध्ये जन्माला येऊन पण वेगळा विचार करु शकली. आज ही आपल्याकडे जुन्या अडाणी रुढी अगदी येता जाता पण दिसतात. काही मुठभर लोकांनी त्यांना सहज मोडीत काढलं त्याला आपण या निमित्ताने उजाळा देऊ. या नवीन संदर्भात त्या गोष्टी अजुन च निरर्थक वाटतात.
१. स्पर्धा नको असा प्राथ्मिक सुर होता. पण नुलकर काकांनी म्हणल्याप्रमाणे स्पर्धा असेल तर आपोआप च दर्जेदार लेखन येतं, एक प्रकारचं उत्तेजन देखील असतं ते. म्हणुन आपल्याला विज्ञान लेखमाला स्पर्धेशिवाय पण लोकप्रिय करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. मग स्पर्धा ठेवली तर लेखकाचं नाव नको ही सूचना कशी वाटते??
२. आवाहन करुन, नोंदणीसाठी गूगल फॉर्म्स तयार करायचा. पंत मदत कराल का? आणि आवाहन करुन आधी, नाव
३. आपण विषयवार यादी देऊन मग लोकांना आवाहन करावे. म्हणजे एक दिशा निश्चित होईल. त्य त्या विषयावर लिहु शकणारे लोक नोंदणी करतील , अजुन ही काही विषय आले तर स्वागत असेल पण ते विषय जर वादांना तोंड फोडणारे असतील तर साधक बाध विचार करुन आपण निर्णय घेऊ शकतो. लेखकाला विषयात थोडा फार बदल सुचवू शकतो.
४. विषयासंदर्भात : ज्ञानिक, संशोधक : मुख्यतः भारतीय असावेत, पण अशी सक्ती नाही. प्राचीन आणि अर्वाचीन (उदा. डॉ. हिम्मतराव बावस्कर).
काही प्रथा, रूढी यांच्यामागचं विज्ञान
भारतीय विज्ञान परंपरा - आयुर्वेद, खगोलशास्त्र
मूलभूत विज्ञान संशोधनावरील (Pure science researchवरील) लेख प्रामुख्याने यावेत.
थोडी खुसखुशीत माहिती, विज्ञानातील गमतीजमती - उदा. चार्ल्स गुडइयरला लागलेला व्हल्कनाइज्ड रबरचा शोध, केक्युलेला स्वप्नामध्ये सापांची रिंग दिसल्यामुळे लागलेला बेन्झीन रिंगचा शोध इ. असे, पण काहीसे अप्रसिद्ध. सेरेंडिपिटीने लागलेले शोध वगैरे.
सर्वसामान्यांना फारसे माहीत नसलेले विषय - उदा. 'इथॉलॉजी' (Ethology - प्राण्यांचं स्वभावशास्त्र) (टीप : या विषयावर मी लेख लिहू शकेन.)
विज्ञानप्रसार करणार्या व्यक्ती-संस्थांबद्दल - उदा. अरविंद गुप्ता, मराठी विज्ञान परिषद, TIFRचा 'Chai & Why' उपक्रम (याविषयी मी लिहू शकेन)
अन्या दातार यांची राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान ही सूचना देखील चांगली आहे. मुळ प्रस्तावात मी सुचवलं होतं त्याप्रमाणे, बाहेर जाऊन संशोधन करणार्यांवर बाहेर जायची वेळ का आली, आपल्याकडचे संशोधक, संशोधन हे दैनंदिन कामात प्रगती घडवुन आणत नाही हा सर्वसामान्य गैरसमज खोटा ठरवणारे संशोधक आणि त्यामुळे घडलेले फरक ( क्वालिटी ऑफ लाईफ वर थेट परिणाम घडवुन आणणारे शोध पण ग्रह तार्यांच्या शोधांइतकेच महत्त्वाचे असतात )
५. या लेखमालेला एक वेगळा टॅब मिळेल काय? तशी व्यवस्था करुन देता येईल का? लेख खाली वर झाले तर नजरेतुन सुटतात.
६.निवड करायची की नाही? निवड नको करुयात. लेखावर येणार्या प्रतिसादांनी लेखकाला आपोआप च पुढील लिखाणासाठी सुचना मिळत जातील. नवीन लेखकांना प्रोत्साहीत करणे हा ही एक उद्देश आहेच त्यामुळे निवड करुन डिसकरेज करायला नको.
७. कालावधी आणि वेळः एक वेळ नवरात्रीची आहे जी योग्य वाटते आहे. त्यावेळी दररोज एक ( किंवा काही, एकुण लेखसंख्येवर अवलंबुन) असे १० लेख ( दसरा पकडुन) प्रकाशित करता येतील. फेब्रुवारी खुप लांब आहे. घटस्थापना १३ ऑक्टो ला होते आहे, १५ ऑक्टो ला डॉ. कलाम यांची पहिली जयंती असेल आणि २२ ला दसरा आहे. पण दिवाळी लगेच च १५ दिवसांवर आहे. यावर मत द्या. अन्यथा फेब्रुवारी मध्ये सायन्स दिनाचं औचित्य साधता येईल.
८. लेखन करण्यासाठी च्या मुदतीत लेखकाने लेख लिहून सा.सं.मं.कडे (एखाद्या विशिष्ट सदस्याकडे किंवा यासाठीच्या वेगळ्या विशिष्ट आयडीवर) पाठवावे. त्यावर संपादकीय, शुद्धीकरण प्रक्रिया करून तो लेखकाकडे पाठवावा. लेखकाने ठरावीक मुदतीत (उदा. ११ ते १६ सप्टें.) तो आपल्या नावाने प्रसिद्ध करावा. ( नुलकराकाकांची सूचना, साभार)
९. आयोजकः नुलकर काका, कॅप्टन , मी, अजुन एक जण हवं आहे. मधुरा ला विचारते.
८. स्पर्धा ठरल्यासः परिक्षकांची नावे यावर सुचना हव्यात.
अजुन काही राहिलं असल्यास सांगा, मी अॅड कर