मिपावर मोबाइलवरून फोटोज कसे प्रकाशित करावेत?

मोबाइलवरून फोटो अपलोड करणे---

A) गाभा

आता अधिकाधिक लोक स्मार्टफोन्स वापरत आहेत आणि त्यातल्या कॅम्र्याने फोटो चांगले येऊ लागल्याने तेच फोटो सोशल साइट्सवर टाकू लागले आहेत.घरातल्या कंम्प्युटरला केबलनेट असली तरी मोबाइल बाहेर नेल्यावर त्याचा वाइफाइ वापरता येत नाही.वाट्सपच्या प्रसारामुळे मोबाइलमध्ये नेट असतेच.फेसबुक अथवा वाट्सपवर आपण फोनच्या मेमरीमधले फोटो थेटच अपलोड करतो.मिसळपाव वगैरे वेबसाइटवर फोटो असे अपलोड करता येत नाहीत. ते दुसय्रा एखाद्या फ्लिकर / गुगल फोटोज / पिकासा इत्यादी फोटो शेअरिंग साइट्सवर फोटो चढवून त्याची लिंक द्यावी लागते. हे काम कम्प्युटरमधून करताना काहीच अडचण येत नाही कारण खूप मोठी मेमरी आणि ब्रॅाडबँड स्पीड मिळतो.

मोबाइलची फ्लोटिंग/random access मेमरी कमी असते आणि सिमकार्डावरचा 3G स्पीडसुद्धा केविलवाणा असतो शिवाय मोबाइल साठीचे वेबपेज हे फुल डेस्कटॉप पेजपेक्षा काटछाट केलेले असते या तीन कारणांमुळे वर दिलेल्या साइट्सवर मोबाइलमधून फोटो अपलोड करून त्याची लिंक मिळवता येत नाही.प्रत्येक क्लिकवर नेट पुन्हा सुरू होते आणि ते स्लो असले तर काम वेळखाऊ होते. याला एक चांगले उत्तर म्हणजे मोबाइलवर चालणाय्रा फोटो शेअरिंग साइट्स वापरणे. दुसरी एक युक्ती अशी की फोनमध्ये दिलेले नोट्स अॅप्लिकेशन वापरून तिथे सर्व लेखन offline लिहिणे आणि नंतर थेट कॅापी पेस्ट करणे. आणखी एक HTML EDITOR अॅप डाउनलोड करावे. यामध्ये लिखाण टाकून offline पुर्वदृष्य बघता येते व चुका सुधारता येतात.

B) काय आणि कसे करावे?

B1) फोटो शेअरिंग वेबसाइटस

B1-a) http://postimage.org/
इथे रेजिस्ट्रेशन न करताही फोटो अपलोड करून लिंक मिळवता येते.
रेजिस्टर करून (कितीही अकाउंट उघडा) अॅल्बम बनवता येतात. इथे फोटो अपलोड झाला की त्याच्याखाली लिंक्स येतात त्यापैकी "Direct link" या चौकोनातली लिंक वापरणे.
ती टेम्प्लेटात *** च्या जागी पेस्ट करा.
Postimg चा स्क्रीन शॅाट

B1-b) tinypic.com

ही आणखी एक साइट मोबाइलमधून चालते.
photobucket या साइटने आता विकत घेतली आहे. photobucket ही चांगली साइट आहे परंतू ती मोबाइलला पूर्ण पेज उघडत नाही. tinypic आता त्याहूनही सोप्पी आहे. इथे रेजिस्ट्रेशन केल्यावर अॅल्बम बनवता येतात.

फोटो अपलोड केल्यावर फोटो दिसेल आणि खाली चार लिंक्स दिसतील त्यापैकी "Direct link for layouts" मधली लिंक घ्या.ती टेम्प्लेटात *** च्या जागी पेस्ट करा.
Tinypic चा स्क्रीन शॅाट

B2) टेम्प्लेट तयार करणे

खालील टेम्प्लेट्स तयार करून तुमच्या फोनच्या नोट्समध्ये साठवून ठेवा.
१) <img src="***" width="500" />
२) <img src="***" width="500" />
३) <img src="***" width="500" />
४) <img src="***" width="500" />
इत्यादी.

B3) वरील टेम्प्लेट्स योग्य त्या कॅापी केलेल्या direct links टाकून संपूर्ण प्रतिसाद नोट्समध्ये लिहून तयार करा.हा कॅापी करून लेखनाची चौकट उघडून "पूर्वपरीक्षण" चे बटण दाबा अथवा खरडफळ्याची चौकट असेल तर वरचे डोळा असलेले बटण दाबा. ठीक वाटले तर "प्रकाशित करा"/ "पाठवा" वर क्लिक केले की झाले काम.

C: प्रश्न

C1) या साइट्सवरचे फोटो किती वर्षं राहतील?
- बरीच वर्ष साइट्स चालू रहातील याची काहीच गॅरंटी देता येत नाही.

C2) फोटो सुरक्षित असतात का?
- नाही. तरी शक्यतो अॅल्बमची नावे मराठीमधून पण रोमन लिपीत द्यावी जसे kala / baag / udyan / shala म्हणजे गुगल सर्च मध्ये सापडणार नाहीत.

C3) अॅल्बममधले फोटो डिलीट केला / केले तर इतर फोटोंच्या लिंकस गंडतात का?
- photobucket मध्ये बाकीच्या खालच्या फोटोंच्या लिंक्स गंडतात. त्यातले फोटो डिलिट करू नये तसेच अॅल्बमचे नाव बदलू नये. postimg, tinypic मध्ये फोटो डिलिट केला तरी चालतो.

C4) फोटोची width किती ठेवावी ?

- 600 {pixels} पेक्षा अधिक नको. सरळ धोपटमार्ग म्हणजे सर्व फोटोंस 500 ठेवा.

C5) फोटोची वेबसाइटवरची लिंक देता येइल का?
- हो.
-तुमचा तीन एमबीचा फोटो शेअरिंग साइटवर असला तरी इकडे जास्तीत जास्त आडवा 600 x 480. Pixel ,आणि उभा 480 x 600 चा येतो आणि न्याय देऊ शकत नाही. अशावेळी मूळ वेबसाइटवरचा फोटो पहाण्याचा पर्यायही लिंक देऊन उपलब्ध करून देता येतो.

फोटोची लिंक देण्यासाठी टेम्प्लेट-

<a href="***" target="_blank" > मोठा फोटो इथे </a >
वरची डिरेक्ट लिंक *** इथे पेस्ट करा.

C6) वाट्सपवर याचा वापर करता येईल का?
- हो. परंतू tinypic ची लिंक नको.जाहिराती येतात.
postimg ची प्रत्येक फोटोची लिंक (टेम्प्लेट नको) दिली तर चालते. फेसबुकवरही चालेल. परंतू फोटो उमटत नाही फक्त लिंक दिसेल.

C7) खरडफळ्यावर "पूर्वपरीक्षण" नाही तर काय करावे?
-वरती डोळ्याचं चित्र असलेलं बटण दाबले की पूर्वदृष्य दिसते.

C8) "प्रकाशित करा" वर क्लिक केल्यावर प्रतिसाद उमटलेला दिसला नाही तर काय करावे?
- तुमचे नेट स्लो असेल.घाई करून पुन्हा क्लिक करू नका अथवा "रिफ्रेश पेज" करू नका.डबल पोस्ट होऊ शकते.प्रथम धागा बंद करून तो पुन्हा उघडून पहा प्रतिसाद आला आहे का.त्यानंतरच प्रयत्न करा.

C9)नेट स्लो झाले असेल तर काय करावे?
- मोबाइल हनुवटीवर टेकवावा.शरीराची अँटिना होऊन स्पीड वाढतो आणि इतरांस वाटेल काय विचार करताहेत.
- ओपेरा मिनि ब्राउजर /युसी ब्राउजर असेल तर keep images off / keep bandwidth low वगैरे पर्याय ठेवा. चित्रे बंद केल्याने स्पीड दुप्पट होतो.

C10) या साइट्सच्या अॅप्स असतात का? आणि अँड्रॉईड तसेच विंडोज दोन्हीवर फोटो शेअरिंग अॅप्स आहेत का?
-या दोन साइट्सच्या अॅप्स आता तर नाहीत. Photobucket चे अॅप (२ MB) आहे परंतू चांगले चालत नाही. इतर अॅप्स असली तरी त्यातून "share on Twitter, Facebook, email" वगैरे पर्याय असतात पण आपल्याला हवी असलेली डिरेक्ट लिंक मिळत नाही.

C11) फोटो प्रोसेसिंग साठी पिक्स आर्ट हे अॅप आहे तशी काही उपयुक्त अॅप्स आहेत का?
-खूप आहेत आणि त्यात भर पडणार आहे.मोबाइलसाठी कमीतकमी मेमरी खाणारी, offline चालणारी, फास्ट आणि बदललेला फोटो मेमरी कार्डावर सेव करणारी अॅप्स निवडावी लागतात (आणि फ्री हे राहिलं).

दोन प्रकारची अॅप्स फोटोंत बदल करण्यासाठी सुचवतो.
१) फोटोचा sharpness, brightness इत्यादी बदलण्यासाठी. याप्रकारची खूप आहेत.
PHOTO EDITOR MASTER (GoTiles कडून)
4MB, offline चालते.

२) तीन चार फोटो एकत्र मांडण्यासाठी. कोलाझ "collage"type
PhotoCollage (Tap plex यांचे)
7 MB, offline चालते.

या अॅपने जोडलेले फोटो चा स्क्रीन शॅाट

D: सूचना

D1) या साइट्स आपण वापरणार आहोत त्या गुगल प्लस/ड्राइव ( Google) आणि फ्लिकर ( Yahoo ), फेसबुक ( facebook) यांच्यासारख्या फार सुरक्षित नसतात त्यामुळे फार खासगी फोटोंसाठी अथवा ज्यांचा गैरवापर होऊ शकेल असे फोटो टाकू नयेत.

D2) या साइट्स फ्री सर्वीस देतात आणि त्यांचा सर्वर चालवण्यासाठी उत्पन्न मिळण्यासाठी बरेचदा "त्या" जाहिराती येतात. त्या येऊ नये यासाठी फोटोची लिंक दिलेल्या टेंम्प्लेटमध्येच बंदिस्त करून कोणास द्यावी. अॅल्बमची लिंक कधीच देऊ नये.

D3) इंटरनेट आणि मोबाइल यांचे विश्व झपाट्याने बदलत आहे.आज असणाय्रा साइट्स उद्या असतीलच असे नाही अथवा त्या वापरण्यात अडचण येऊ शकते. वेळोवेळी बदल करणे अपेक्षित आहे.
मोबाइल हे MFD Multi function Device आहे शिवाय घेऊन जाता येते त्यामुळे मोबाइलचे तंत्र आत्मसात करणे आगामी काळाची गरज आहे.

Correction
2021 _january 1
१) https://postimages.org हे नवीन नाव आहे.

२) postimg.org ही साईट आता https://postimg.cc झाली आहे.

३)http://tinypic.com ही साईट photobucket.com या साईटने विकत घेतली आहे. आता बंद झाली.
४) photobucket.com ही साईट चांगली होती आणि आहे परंतू ती आता फ्री अकाउंटला शेअरिंग देत नाही.