गेल्या काही दिवसांमधे एकुणचं मिपावरच्या बदलणार्या वातावरणाचा, दोन्ही बाजुकडुन चालणार्या कंपुबाजीचा आणि एकुणचं डुआयडींच्या वाढलेल्या काँग्रेस गवताचा आता मला वैयक्तिक पातळीवर त्रास व्हायला लागलेला आहे. (फोन, मेसेजेस, व्हॉट्स अॅप ई.ई.)
टाळी एका हातानी वाजत नाही. त्यासाठी दोन्ही हात लागतात. मी एक बाजु बरोबर आणि दुसरी बाजु चुकीची असं बायस्ड कन्क्लुजन अजिबात काढणार नाही. चुका दोन्ही बाजुंकडुन होतं आहेत. ह्या चुकांमुळे दोन्ही बाजुचे जुने जाणते आयडी आणि त्यामागच्या व्यक्ती दुखावल्या जातं आहेत. दोन्ही बाजुंकडुन चालणारे टंकनवाद पुर्णपणे विषयाला धरुन होते तोपर्यंत ते चालायला काहीही हरकत नव्हती. आता काही मंडळी हे वाद वैयक्तिक पातळीवर न्यायला लागलेली दिसतं आहेत. कृपया दोन्ही बाजुच्या सिनियर मेंब्रांनी ह्यामधे वेळीच हस्तक्षेप करावा. ह्या मेनबोर्डावर थेट होणार्या वादांमधे सद्ध्या संशयास्पदपणे डुआयडी तेल ओतताना दिसत आहेत. डिव्हाईड अँड रुल चा प्रकार स्पष्ट पणे जाणवायला लागलेला आहे. हा प्रकार जाणुनबुजुन केला जातोय हे स्पष्टपणे दिसतो आहे.
त्यामुळे इथल्या जुन्या जाणत्या लोकांनी दोन्ही बाजुंच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या सळसळणार्या हातांना पुढाकार घेउन आवर घालावा हि णम्र विनंती.
मला हि विनंती करायचीही गरज नव्हती. पण आता गोष्टी पार वैयक्तीक पातळीवरही उतरायला लागलेल्या आहेत. व्हॉट्स अॅप ग्रुपवर म्हणा किंवा अगदी वैयक्तीक व्हॉट्स अॅपवरुन म्हणा थेट माझ्या न्युट्रल रहाण्यावर वैयक्तिक स्वरुपामधे टिका व्हायला लागलेली आहे. नॉट अॅक्सेप्टेबल फॉर मी.
दोन्ही बाजुंनी जरा चार पावलं मागे सरका. शांत घ्या. दिवाळी आणि दिवाळी अंक एंजॉय करा. जो वेळ बोंबलत अर्थहिन वाद घालण्यामधे वाया जातोय त्यापेक्षा काहितरी प्रोडक्टिव्ह लिहिण्यावाचण्यामधे नाहितर दुसर्या अॅक्टिव्हिट्यांमधे घालवा ना. सगळ्यांनाचं कामाचे, वैयक्तिक स्वरुपाचे ताणतणाव असतात. त्यामधुन मोकळं होण्यासाठी इथे लोक्स येतात वाद घालायला किंवा वाचायला नव्हे. गंमतीजंमतीमधले वाद चिडवाचिडवी अपवाद. त्यातुन आत्ता गडे मुडदे बाहेर यायला लागलेले दिसायला लागलेत. परत नुने स्कोअर सेटलिंग आणि नव्याने वाद होणार ह्याची खात्री आहे.
समिंग अपः
I am not asking you to be friends. All I am asking you is for mutual respect and understanding. नाहितर अवघड आहे.