रंगीबेरंगी स्टुटगार्ट

खरतर फॉल कलर्सच्या धाग्यावरच हे फोटो टाकायचा विचार होता पण संख्या थोडी जास्त होती म्हणून वेगळा धागा काढला...

विंटर सुरु झाला आहे आणि आता झाडांच्या रंगीबेरंगी छटा दिसायलाही सुरुवात झाली आहे.
सुदैवाने मी सध्या स्टुटगार्टमध्ये असल्याने हे दृश्य प्रत्यक्ष पाहायला मिळाले आणि फोटो ही काढता आले.
स्टुटगार्टमध्ये फिरताना काढलेले काही इकडचे तिकडचे फोटोही यातच चिकटवले आहेत.

पहिल्या फोटोमध्ये स्टुटगार्टची थोडीशी ओळख
१. königstrasse (The King's road ): ही स्टुटगार्टची शॉपिंग स्ट्रिट आहे. शनिवारी तर भयंकर गजबजलेली असते. वेगवेगळे कलाकार इथे येउन आपापली गायन,वादन,नृत्य कला सादर करतात जर तुम्हाला ती आवडली तर थोडे पैसे तुम्ही त्यांना देऊ शकता. इथे शनिवारची संध्याकाळ अनुभवणे खरच आल्हाददायक असते.
shopping street

२. Break Up... : लव्ह लॉक्स हा प्रकार इथेही चालतोच, पण मला प्रश्न पडायचा कि समजा अशी लॉक्स लावणार्यांच पुढे काही बिनसलं तर काय? बहुधा हे त्याच उत्तर असावे...
break up

३. सामना: बागेमध्ये काही वयोवृध्द बुद्धिबळ आजमावून पाहताना
chess

४. Two Face :
two face

५. "राज"हंस:
The swan

६. आता खरे फॉल कलर्स सुरु
pic1

७.
pic2

८.
pic3

९.
pic4

१०.
pic5

११.
pic6

१२.
pic7

१३.
pic7

फोटो कसे वाटले किंवा कुठला जास्त आवडला हे जर वेळ काढून सांगितलेत तर खूप आवडेल! :)