मंड्ळी दिवाळी अंकाला थोडा थोडा आकार यायला लागला आहे. दिवाळी अंकासाठी एचटीएमएल पानं ब्याकग्राउंडला ज्यात फटाके, अतिशबाजी, आकाश कंदिलं, पणत्या.... अशा टाईपची पानं कोणी तयार करु शकतं का ? हिडर, फूटर, शीर्षकं आणि ब्याकग्राउंड असं काही कोणाला जमतं का ? आणि त्या पानांवर लेखन कॉपी पेष्ट करता आलं पाहिजे. जमतं पण त्याला खुप वेळ द्यावा लागतो हे मान्य. एक पान तयार करुन दिलं तरी आम्ही कॉपी पेष्ट करु. काय म्हणता कोणाला जमेल ? किंवा काही सुचना करु शकाल का ? मिपाचे सर्वेसर्वा नीलकांत, प्रशांत आणि अभ्या ही मंडळी ही कामं करणारच आहेत पण अजून कोणी अशी पानं तयार करुन देऊ शकेल का ?