
जोळी डंगर्या बैलाची
झालं कचूमचू गाळं
वाटं उतरेलं चाकं
असे जिंदगी चे हालं
जो येते तो बोलूनचं
निर्हा गामनं ठेवते
होनं जानं काई नाई
फक्त चकोन्या दाखोते
कायं कोनाच्या पोटातं
नाई होटावरं दिसे
जातो भरळल्या आमी
दाने जात्यातले जसे
कई फुटीलं भोपया
निंगतीलं ह्या झापळा
भिता सारोल्या जातीलं
कई खचूनं पोपळा
आमी बापा साधे सुधे
नाई समजतं कावा
नोका चितं पाऊ आता
बेळ्ळी लागली रे बावा
