नमस्कार,
आज जो प्रकार चावडीत झालाय तो अतिशय चुकीचा आणि आपल्यासर्वांनाच न शोभणारा आहे. गेल्या जानेवारीत सुध्दा असा प्रकार चावडीत झाला होता. त्यावर सुध्दा मी नाराजी दाखवली होती. आज त्यापेक्षा जास्त वाईट वाटले.
चावडीत जेव्हा एकापेक्षा अधिक लोक घेतल्या जातात तेव्हा मतभेद हे होणार हे गृहीतच आहे. मात्र मिपाच्या संपादक मंडळाने हे मतभेद हे समजुतदारपणे सांभाळायला हवे आहेत. आज जे काही चावडीतील धाग्यांवर लिहील्यागेले आहे ते अनपेक्षीत आहे आणि अजिबात योग्य नाही.
झाल्या प्रकारामुळे अतिशय दुखावलोय. तुम्ही लोक हा प्रकार टाळू शकले असते असे नक्की वाटते. यापुढे तुम्ही कुणीही चावडीत काहीही लिहू नये.
- नीलकांत