
(प्रेरणा :- पाखरा! येशिल का परतून?)
जाह्नवे! येशिल बाळंतून?
महत्प्रयासाने, किती मास
झाले ते अठवून? जाह्नवे! ||१||
सेटवर मिसळलेल्या श्रीच्या
निःश्वासा वळखून? जाह्नवे! ||२||
टाळशील अजून किती दिवस
'काहीही हं' म्हणून? जाह्नवे! ||३||
थांब, मोजू दे एपिसोड हे
झाले किति पाहून! जाह्नवे! ||४||
टीव्ही उघडता मज दिसे ही
डोहाळ्याची खूण! जाह्नवे! ||५||
विसरशील तू, पण प्रेक्षकच
म्हणती तुला 'जपून!' जाह्नवे! ||६||
घे आताच कळा शेवटच्या
चार ज़रा सोसून! जाह्नवे! ||७||
-- स्वामी संकेतानंद --
('बाळंतून'सारखा मराठी शब्द नाही हे माहीत आहे, पण मालिकांमधला एकूणच कृत्रिमपणा अधोरेखित करायला हा शब्द निर्मिला आहे.)
