
जवळची होकाल कुरडी भासता, कारण
तेच्या डोळ्यातला कुसाळ दिसता
लांबची होकाल चोकट गमता, कारण
तेनी सोसलेला मुसळ म्हायत नसता
लांब आसतत तेव्हा सगळेच सगे-सोयरे
मदत करूची येळ इल्यार कुणी कुणाचे नायरे
म्हणूनच म्हणतात दुरून डोंगर साजरे
पण डोंगरात घुसल्यार दिसतत सगळे काजरे
हातातल्या काकणाक कित्या होयो आरसो?
म्हागडो गॉगल लावल्यान तरी डोळ्यान तिरसो
टिचभर तवशात हातभर बीया
तुझी फकांडा ऐकाक मोकळो नाय मीया
असतील शीता तर जमतील भुता
पण माणूस होया देता-घेता
देव तारी तेका कोण मारी
येळ इल्यार कोण नाय सावरी
आसात हरी तर देयत खाटल्यावरी
तरास नको कसलो म्हणून तब्येत नाय बरी
दुनियेत बळी तोच कान पिळी
जेचा खावचा तेची वाजवची टाळी
आडातच नाय तर पोयरात खयसून येता?
नशीबातच नाय तर लॉटरी कसली लागता?
आपलोच कार्टो तर शेजारचो कसलो फळता?
धरलो तर धावता आणि सोडलो तर पळता
दिसता तसा नसता म्हणून जग फसता
खोटा बोलणारो शेवटी तोंडार आपाटता
अडाण्याक चपलाचो तर शहाण्याक शब्दाचो मार
बुडणार्याक पाठ आणि उगवत्याक नमस्कार
करूचा तसा भरूचा ह्यो निसर्गाचो न्याय
स्वतःपुरतो जगणार्याक उद्या कोण नाय
जमली तेव्हा मजा केल्यान पुढचो नाय इचार
म्हातारपणी कोन नाय, तेव्हा माणूस होता लाचार
------- मनमोहन रो. रोगे, ठाणे.
भाषाटः ९८६९१८०९५८
.
शेजारचा बायो कॉलेजात जाता
शेजारचा बायो कॉलेजात जाता
तोंडाक मेकअप लिप्स्टिक लावता
चलताना हडे – थडे बघित चलता
रस्त्यान जाताना नुसता मिरावता
मिरावता तर मिरवाने, तुझा काय जळता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||१||
केसांची बट डोळ्यार उडवता
जीन्सवर तोकडा टी-शर्ट घालता
बघताना डोळ्यांच्या कोपर्यातून बघता
शेजारच्या माणसांका अनोळखी भासवता
भासवल्यान तर भासवने, तुझा काय अडता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||२||
पायात बूट तर कधी सॅण्डल घालता
खांद्यात मॅचिंग पर्स अडकवता
डोळ्यांका आयलायनर लावता
बघणार्यांचा काळीज हलवता
हलवता तर हलवने, तुझा कित्या हलता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||३||
बघुचा तेव्हा कानाक हेडफोन लावता
आपल्याच धुंदीत, जगाक इसारता
घरातली झोपल्यार चॅटिंग करता
२४ तास हातात मोबाईल धरता
धरता तर धरू दे, तुझा काय झरता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||४||
हल्ली घरातल्या कामात लक्षच नसता
मित्र-मैत्रिणींबरोबर फिरफिर फिरता
दर वर्षी नेमान पास मातर होता
माका कळना नाय, अभ्यास कधी करता?
करूचो तेवा करता, तुझा काय सरता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||४||
- श्री. मनमोहन रोगे, ठाणे.
डिसेंबर २०१४
