चला, आपलं मूल्य परत मिळवूया!

नमस्कार मिपाकरांनो!

बापू आणि शास्त्रीजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ___/\___

चित्राविषयी:
हे चित्र मी दोन वर्षांपूर्वी पेन्सिलने रेखाटलेलं आहे!

तसा मी बरे चित्र वगैरे काढतो. माध्यम कुठल, कागद कुठला, पेन्सिल वा ब्रश असल्या फंदात कधी(च) पडत नाही. बरयाचदा पेनही चालतो. वही, Notepad च पानही चालत. याचं कारण म्हणजे कुठलही अधिकृत शिक्षण घेतलेलं नाही. तरी आवड आहे म्हणून एके दिवशी मनावर घेऊन दुकानातून एक चांगली मोठी चित्रकलेची वही घेऊन आलो. 'आता हे अजून एक खूळ', ह्या बायकोच्या तुसड्या नजरेला झेलत आजवर दोन पान वापरण्यात यशस्वी झालोय!

त्या एका दिवशी चित्र कशाच काढू या विचारात असताना त्याच दिवशी गांधीजींबद्दल काहीतरी वाचनात आलेलं असल्याने गांधीजीच डोक्यात घोळत होते. मग त्यांच्यावरच काहीतरी काढायचं ठरवलं आणि हे चित्र साकार झाल!

यातला फक्त गांधीजींचा चेहरा मी ट्रेस केलेला आहे बाकी सर्व हातानेच रेखाटलेल आहे!

आज गांधीजींच्या जयंतीनिमित्त हे चित्र तुमच्यासमोर सादर करत आहे. चित्र कस वाटतय नक्की सांगा. त्यातल्या उणिवाही सांगितल्या तर बरे होईल! इथे चित्रातली बरीच जाणकार मंडळी आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभल्यास मी धन्य होईन!

- संदीप चांदणे