रामराम मंडळी. दिवाळीअंकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दिवाळी अंकासाठी काही मदतनीस आणि सहसंपादक हवे आहेत. मिपाचा अंक अधिकाधिक दर्जेदार व्हावा, चांगले लेखन वाचायला मिळावे अशी सर्वांची अपेक्षा असते. मिपासंवादावर उपस्थितांची मदत होणारच आहे तर मिपावर सध्या लेखन यायला लागलं आहे. लेखनाचा वेग तसा कमीच आहे. जीमेल वर चार पाच मेल आलेले दिसत आहेत. मिपा व्य.नि.वर अजून एकही लेख आलेला नाही. पण लेख जसजसे यायला लागतील तसं तसं काम वेग घेईल. कथा, व्यंगचित्र,कविता, पाकृ आणि जे काय असेल ते....तेव्हा..
१) आलेले लेखन त्याची अद्ययावत माहिती देणे वाचन करणे.
२) संपादकाबरोबर लेखन निवडण्यास मदत करणे.
३) लेखन मुद्रितशोधनासाठी श्री नुलकर साहेबांकडे देणे.
४) लेख आल्यानंतर लेखात हे राहीलं, ते राहीलं, असे बदल करा, अशा लेखांना दुरुस्ती करुन योग्य पोच देणे.
५) मिपा दिवाळी अंक असा एक धागा काढुन सर्व लेख पेष्टवने.
६) ऐनवेळी काय असेल ते..
६) मिपा दिवाळी अंकाचे मुख्य संपादक म्हणजे वधुचे वडील ते नुसतं नवं कापड-धोतर घालुन इकडे तिकडे मांडवात फिरतील, असं करा, तसं करा सांगतील. कोणी ऐकलं नाही तर रागारागाने एखादी भाजीची बकेट उचलुन ते पंक्तीला बसलेल्यांना वाढुही लागतील तेव्हा कोणीतरी येऊन तुम्ही राहु द्या आम्ही इकडे बघतो असे म्हणनारे माणसं हवी आहेत. :)
आपल्या या कामास मदत करणार्यांना कोणतंही मानधन मिळणार नाही. सेवाभावी वृत्तीनं हे काम करायचं आहे. फार फार मिपामाललक नीलकांतसेठला वेळ मिळाला की ते आपल्याला आभाराचा व्य.नि.करतील.
मिपाचं डिझाईन. अभ्या, प्रशांत, आणि मालक ठरवतील. आपण सांगूच हे असं पाहिजे तसं पाहिजे. आपण इच्छुक मंडळी व्य.नि.ने दिवाळी अंकाच्या गप्पा करत राहु असे वाटते. तेव्हा स्वतःहुन आपली नावं द्यावीत ही लम्र विनंती.
मला मदतीला नावं दिसली ती अशी.
१) कॅप्टन
२) स्रुजा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दि. ६/१०/२०१५. अपडेट
१. वेल्लाभट आणि मधुरा= लेखवाचन आणि शुद्धलेखन सुधारणा तसचं माहिती अद्ययावत ठेवणे. (जेवढ्या सुधारणा नुलकरकाकांकडे जायच्या आधी केल्या जातील तेवढं त्यांच्यावरच्या कामाचा ताण कमी होईल.)
२. आदूदादु= वेल्लाभट आणि मधुराच्या चाळणीमधुन आलेल्या लेखांमधे अजुन जमतील तेवढ्या सुधारणा करुन नुलकरकाकांकडे पाठवणे आणि नुलकरकाकांकडुन संपादित होउन आलेले लेख जपुन ठेवणे. त्यांचं पुनर्वाचन करणे.
३. विशाखा= निवडल्या गेलेल्या सर्व लेखांचं सखोल वाचन. त्यामधे असलेल्या कमतरता सदर लेखक वं लेखिकेपर्यंत पोचवणे. लेखकाकडुन लेखामधे सुधारणा होउन आल्यावर परत त्या वेल्लाभट आणि आदूदादुसच्या चाळणीमधुन नुलकरकाकांकडे पोचवणं आणि परतावा घेणं.
४. पैसा/ प्रतेतस/ प्रा.डॉ.= दिवाळी अंकाच्या आवाहनाचा धागा किमान १० तारखेपर्यंत वरती राहिल ह्याची काळजी घेणे. आणि तुमच्या प्रदिर्घ काळामधल्या मिपावरच्या ओळखींच्या मंडळींना दिवाळीसाठी लिहितं करणे ( ओळखींमधुन प्रत्येकी किमान २-३ लेख अपेक्षित आहेत). जे जुने सदस्य पुर्वी उत्तम लिहायचे पण आता मिपावर नाहित किंवा फक्त वाचनमात्र आहेत अश्यांकडुन लेख आले तर सोन्याहुन पिवळं. त्यानिमित्तने ते लिहिते होतील.
५. कॅप्टन/ स्रुजा/ रंगा/ यशोधरा/ प्रचेतस/अजया /स्नेहांकिता = १ ते ६ पर्यंतच्या सगळ्या खिंडी लढवणे आणि ह्या गोष्टी अभ्या आणि नुलकरकांकांबरोबर व्यवस्थित को-ऑर्डिनेट होतील ह्याची जबाबदारी घेणे. तसचं नव्या आयड्यांना दिवाळी अंकासाठी लिहितं करणे. (रंगाला शक्यतो फक्तं हापिसातुन होईल तेवढचं काम करायला लावणे).
६. ह्याउप्पर मनुष्य बळ कमी पडत असल्यास साहित्य संपादकांशी कॅप्टनने संपर्क करावा.
सध्या माझ्याबरोबर फुलटाईम कॅप्टन सोबत आहेत. अजून काही नावं सुटली असल्यास त्यांनाही काम सांगतोच आहे.