गणेश चतुर्थी १७ सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशी २७ सप्टेंबरला. म्हणजे अकरा दिवस आहेत.
गणेश चतुर्थीला श्रीगणेश लेखमालेचं स्वरूप वगैरे सांगणारा प्रस्तावनापर लेख प्रकाशित करावा असं वाटतंय. तशीही सुट्टी असल्याने मिपावर येणार्यांची संख्या कमी असेल. एखादा चांगला लेख धारातीर्थी नको पडायला.
माझ्या डोक्यातला अनुक्रम असा आहे:
ता० १७ - प्रस्तावना
ता० १८ - बोका-ए-आझम
ता० १९ - कॅप्टन जॅक स्पॅरो (भाग १, २, ३)
ता० २० - लाल टोपी
ता० २१ - प्रभाकर पेठकर
ता० २२ - प्रज्ञा देशपांडे
ता० २३ - प्रास
ता० २४ - पिशी अबोली
ता० २५ - अन्या दातार
ता० २६ - अभ्या..
ता० २७ - मृत्युन्जय (आला आहे.)
प्रस्तावनेचा लेख याच धाग्यात अपडेटवतो. योग्य बदल करून संमं या आयडीने प्रकाशित करावा.
____________
प्रस्तावनेचा लेख
सर्व मिपाकरांना आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आठ वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ".. लोग आते गए, कारवाँ बनता गया" हे मिपाला शंभर टक्के लागू पडतं. वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस ते भाषाशास्त्रज्ञ ते गुरुजी ते दंतवैद्य असा (आणि याहीपलीकडचा) विस्तीर्ण पट मिपाकरांनी व्यापला आहे.
मिपाचं हे वैशिष्ट्य झ़ळकून उठावं, म्हणून यंदा आम्ही मिपाच्या काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी लिहितं केलं. त्यांना स्वतःच्या व्यवसायाविषयी लिहिण्यासाठी मुक्तहस्त दिला. शिक्षणाचं स्वरूप, शिकतानाचे बरे-वाईट अनुभव, काम करतानाचे अनुभव, हा विशिष्ट व्यवसाय करण्यासाठी लागणारे गुण, आजवरचा प्रवास, अशा बहुविध पैलूंवर या लेखकांनी लिहिलं आहे. श्रीगणेश ही बुद्धीची देवता. त्यामुळे श्रीगणेश लेखमालेत व्यवसायांवर आधारित लेख यावेत हे औचित्य साधलं गेल्याचा आनंद आहे.
मिपावर यापूर्वीही 'अकादमी', 'गुरुजींचं भाव-विश्व', 'राजाराम-सीताराम', 'पूर्वेच्या समुद्रात', 'प्रांतांच्या गोष्टी' अशा कार्यक्षेत्राशी निगडित लेखमाला आल्या आहेत, लोकप्रिय झाल्या आहेत. अशीच लोकप्रियता याही लेखमालेला मिळो, ही श्रीगणेशाचरणी प्रार्थना.
ही लेखमाला प्रत्यक्षात आणण्यात संपादक मंडळाचे आणि साहित्य संपादक मंडळाचे श्रम कारणीभूत आहेत. तरी या लेखांचं श्रेय सर्वस्वी लेखकांचंच आहे. 'फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥' अशीच संमंची आणि सासंमंची भावना आहे.
उद्यापासून (ता० १८ सप्टेंबर) ते अनंत चतुर्दशीपर्यंत रोज एक लेख प्रसिद्ध होईल.
------------
सूचनांचं स्वागत आहे हेवेसांनल.