सप्टेंबर महिन्यातील साहित्य संपादन

नमस्कार,

या महिन्यातील साहित्य संपादन विषयक नोंदी व चर्चा येथे करता येईल.

काही निरिक्षणे

  • जुन व जुलै महिन्यांपेक्षा साहित्य संपादनाच्या नोंदी बर्‍याच कमी वाटत आहेत. बहुधा संपादन करण्याची गरज हळू हळू का होईना कमी होत आहे असे वाटते.
  • आपले काम सुरु झाल्यापासून एक पॅटर्न दिसतोय. काही लोकांच्या लेखांत अनावश्यक ब्लँक स्पेसेस दिसतात. तसेच जिथे असायला हव्यात जसे स्वल्पविराम किंवा पूर्णविराम तिथे मात्र त्या दिसत नाहीत. बरेच लोक फोन किंवा टॅब्लेट्समधून लेखन करतात. त्यामुळे असे होत असेल का? मी जेव्हा इतर दुरुस्त्यांसाठी एखादा लेख संपादित करतो तेव्हा हे देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, अर्थात मर्यादित प्रमाणात असेल तर.

असे इतर काही पॅटर्न आढळत असतील तर त्याबद्द्ल प्रतिसादांत अवश्य लिहा.