विज्ञान लेखमाला

आदुबाळांच्या शशक ला दणदणीत प्रतिसाद मिळाला आहे, त्याने सगळ्यांचाच उत्साह वाढला आहे. श श क च्या वेळेस आलेला महापूर आलेला बघुन या लेखमालेचा प्रस्ताव थोडा लांबवणं योग्य वाटलं आणि ते बरंच झालं कारण बाबासाहेबांच्या लेखावर पण एक वीक लोकं पुर्ण पणे लक्ष केंद्रीत करुन होते. तर या लेखमालेचं स्वरुप कसं ठेवुयात? मुळ प्रस्ताव इथे डकवते आहे:

आज डॉक्टर अब्दुल कलामांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली म्हणुन आपण एक लेखमाला सुरु करायचं आवाहन करुयात का? कलामांचं योगदान आणि त्यांच्यासारख्याच इतर अनेक शास्त्रज्ञांचं भारतातलं योगदान हा विषय कसा वाटतोय? या निमित्ताने आपल्या वैज्ञानिक परंपरेची पुन्हा ओळख होईल. आजच्या काळातही अनेक प्रथा, विश्वास, रुढी यांना आपल्यातले अनेक जण चिकटुन बसले आहेत. या निमित्ताने अशा योगदानाची सांगड त्यावर भाष्य करण्यासाठी घातली तर ते प्रसंगाला अनुरुप राहील. मिपाकडुन डॉ. कलाम यांना एक आदरांजली असं याचं स्वरुप ठेवु शकतो.

लोकांना लिहीते करणे या उद्देशात पण भर पडेल. सुचना, सुधारणा जरुर सांगा. अजुन मी पण यावर विचार करते आहे म्हणुन वेगळा धागा काढला नाही. पण काढेन तो पण.
अनेक लोकं जेंव्हा आज भारताबाहेर आपलं कर्तृत्व दाखवुन ऐन वेळी राजकारणी मतं प्रदर्शित करुन फुटेज खायच्या मागे आहेत तेंव्हा अशा लोकांची आठवण रीफ्रेशिंग ठरु शकते. त्यांच्यासारखी माणसं आपल्यामध्ये आणि आपलयासारख्याच परिस्थिती मध्ये जन्माला येऊन पण वेगळा विचार करु शकली. आज ही आपल्याकडे जुन्या अडाणी रुढी अगदी येता जाता पण दिसतात. काही मुठभर लोकांनी त्यांना सहज मोडीत काढलं त्याला आपण या निमित्ताने उजाळा देऊ. या नवीन संदर्भात त्या गोष्टी अजुन च निरर्थक वाटतात.

सर्वांना खुली ठेवण्यासाठी याचं स्वरुप काय असावं? अजुन एक स्पर्धा च ठेवायची का? की इतर काही मार्गाने लोकांना लिहायला उत्तेजन देता येईल?

काही जणांना निमंत्रित करावं असं पण वाटतंय. नावं सुचवाल का ?

श श क च्या वेळे पासून एक सुचना मनात होती. आपण आयोजक निदान २ ठेवुयात. त्यांची नियोजित कामं ठेवुयात. त्यात फॉलो अप करण्यासाठी अजुन एक तरी असु देउयात. हा आयोजक कामं लक्षात आणुन देण्याचे काम करेल मुख्य तः . बाकी त्या वेळे सारखं च सगळे लक्ष ठेवुन असुच यात. काय वाटतं?