[शतशब्दकथा स्पर्धा] सामक्षा

आमचं गाव काय हे न्हवे. ते तिते तळकोकणात!!
किनार्‍यावरना गोरे आले, धर्मांतरं सुरु केल्यानी. भरीसभर शाहाची माणसा होतीच. मग आमच्या सासर्‍यांच्या पणजोबांनी सगळा बाडबिस्तारा उचलल्यानी नि आले हिकडे आडगावात!! चांगली जागा बघून घर बांधू म्हटले, गावकरी सांगत जागा बरी नाय. दुसर्‍या कुटंव्ह बांदा पण हिते नको. पणजोबा पण खमके, घर बांधून दाखवलंनी.
सगळं नीट झालं, घर बांधून गाठीस पयशे र्‍हायले. म्हयन्याभरान घरभरणीचा मुहूर्त काढल्यानी.
पणजीबाई पंगतीसाठीचे तांदूळ सडायला म्हणून उभ्या र्‍हायल्या नि दोन घाव घातले नाय की लकाटल्या. विंचवान सरळ टाळूवरच डंख मारलान.
"मोठी सून फार जगत नाय ह्या जागेत", असं गावकरी म्हटले होते. ती पणजीबाईंपासना चाललेली परंपरा माझ्यापर्यंत चालल्ये.