नमस्कार मंडळी,
मिपावर आपण जे वेळोवेळी बॅनर्स प्रकाशित करतो त्यासंदर्भात हा धागा आहे.
आपणा सर्वांच्या ग्राफिक्ससंदर्भात इतर कल्पना असतील किंवा काही रिमाईंडर्स द्यायचे असतील तर इथे देऊ शकता. सध्या ग्राफिक्स मी एकटाच करतोय. कुणी मिपाकर अशी कामे करण्यास इच्छुक असल्यास त्यालाही घेता येईल. येणार्या प्रसंगाची (उदा. उद्याचा स्वालंत्र्यदिन) आठवण येथे करुन द्यावी. मी ते इथे प्रकाशित करीत जाईन म्हणजे संमं पैकी जो उपस्थित असेल तो इथुन घेऊन बोर्डावर वेळेवर प्रकाशित करेल.
दिवाळी अंकासंदर्भातील ग्राफीक्स आयडीया पण इथेच द्याव्यात ही नम्र विनन्ती.