- 7499 views
"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..."
सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला..
दुसर्या दिवशी भल्या पहाटे, शहर पुन्हा उठले.
पुन्हा पेटले.
उजाडता उजाडता काही दिवे,
पुन्हा मालवले..
कायमचेच..
त्याचे मात्र आज काहीतरी बिनसले होते. आवळलेल्या मुठी, अन चिमुकल्या डोळ्यात फुललेला अंगार. ज्यात एक अख्खा जमाव जाळायची ताकद होती.
पण एक मूक आक्रोश करत त्याने ईतकेच विचारले,
ओये ऽऽ चाचा को क्यू मारा??..