[शतशब्दकथास्पर्धा] दान

"अरे,त्याला सांगु तरी काय? आणि कसं?...काय म्हणेल तो मला?..कशी जाऊ मी त्याला सामोरी?,नको रे अश्या संकटात लोटुस..माझ्यामधे आता धैर्य उरलं नाही...."

"तुला जे हवे ते मी त्याच्याकडुन मिळविनही,तो देईलही..पण पुढे मी त्याला काय तोंड दा़खवु,सांग ना.."

"जी गोष्ट आयुष्यभर नव-यापासुन,मुलांपासुन लपवत आले..आता त्यांच्याच भल्यासाठी ह्याच भांडवल करु बघतोस...अरे माझी थोडी लाज ठेव..."

"ह्यात कोणाचा फायदा आणि तोटा कोणाचा,तुच जाणे,...आमच्या दोघांसाठी मात्र हे जगच पार बद्लुन जाणार आहे...होऊ दे तुझ्या मनासारख...तो बघ,तो आला..."

गंगेचा घाट चढत येणा-या कर्णाकडे बघत कृष्ण आणि कुंती स्वस्थ उभे रहिले.........