- 2974 views
"शरद ४१ वर्षाचा मला सोडून गेला.ती रात्र मला खूपच भयानक वाटली.सकाळी बेडवर शरद दिसला नाही.त्याच्या उशी खाली सुगंध लावलेला त्याचा हातरुमाल दिसला. उचलल्यावर, त्याला आवडणार्या सेंटचा, वास माझ्या नाकात गेल्यावर पुन्हा ताजी आठवण मला त्रास देऊ लागली होती.काल तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.रुमालावरच्या सेंटचा वास घेत मी हवं तेव्हडं मला रडून घेतलं.शरदीनी,माझ्या पायाशी घुटमळत होती.
शरदला जाऊन बरीच वर्षं गेली.
"मी नवर्यावर प्रेम करायची"
असं मी कसं बोलू.?प्रेम नेहमीच ताजं असतं."
असं बोलून मंदाकीनी त्याच सुगंधी रुमालाने आपले अश्रू पुसत होती.
जणू शरदच तिला त्या रुमाला मधून
"नको रडूं"
म्हणत होता.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)